विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द विकास मार्गदर्शक राजन पाटील यांनी खरा केला

सव्वादोन कोटीच्या अर्जुंनसोंड-लांबोटी रस्त्याचा शुभारंभ
आ. यशवंत माने यांच्या पाठपुराव्याला यश

आ. यशवंत माने यांच्या पाठपुराव्याला यश
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- दीड वर्षांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरातील रस्त्यांच्या समस्येकडे माजी आमदार राजन पाटील यांचे लक्ष वेधले होते.राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळे आणि माजी आमदार तथा विधानसभा मतदार संघाचे मार्गदर्शक राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्या अविरत पाठपुराव्यामुळे मोहोळ मतदारसंघातील रस्त्यांना समाधानकारकरीत्या शासनस्तरावरून निधी मिळत आहे. त्यातूनच अर्जुनसोंड ते लांबोटी या रस्त्यासाठी सव्वा दोन कोटीचा निधी मंजूर झाला आहे.दिलेला शब्द पूर्ण करण्याचा माजी आमदार राजन पाटील यांचा स्वभाव आहे. अर्जुनसोंड परिसरातील रस्त्याच्या निधीचा दिलेला शब्द पूर्ण होत असल्याची बाब आनंददायी आहे. येत्या काळात मतदारसंघातील उर्वरित सर्व रस्त्यांची कामे निश्चितपणे मार्गी लागतील अशी ग्वाही लोकनेते कारखान्याचे चेअरमन तथा जि प सदस्य बाळराजे पाटील यांनी दिली.
अर्जुनसोंड येथे माजी आमदार राजन पाटील- अनगरकर व आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातुन २ कोटी २५ लाख रुपये निधी मंजुर झालेल्या अर्जुनसोंड ते लांबोटी या रस्त्याचे भुमिपूजन आमदार यशवंत माने आणि लोकनेते कारखान्याचे चेअरमन तथा जि प सदस्य युवा नेते विक्रांत तथा बाळराजे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेसीबी मशीनची पूजा करून आणि कुदळ मारून उभय नेत्यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बाळराजे पाटील बोलत होते.
यावेळी प्रकाश चवरे, धनाजी गावडे, नागेश साठे, सज्जन पाटील,राहुल मोरे,शुक्राचार्य हावळे, शशिकांत पाटील,शाहीर खांडेकर,महेंद्र वाघमारे,दादा नागणे व महादेव हावळे उपस्थित होते.
तब्बल चारशे कोटींचा विकासनिधी..
आमदार यशवंत माने यांनी मोहोळ मतदारसंघाच्या लोकप्रतीनिधि पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून चारशे कोटीपेक्षा जास्त निधीची विकासकामे मतदारसंघात खेचून आणली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने विकासाच्या रक्तवाहिन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यांसाठीचा निधी उल्लेखनीय प्रमाणात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध केल्यामुळे तालुक्याच्या दक्षिण - पुर्व भागातून आनंद व्यक्त केला जात आहे. निधी उपलब्ध करून आणल्याबद्दल आ.यशवंत माने आणि बाळराजे पाटील यांचा पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने शुक्राचार्य हावळे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
मोहोळ विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मोहोळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी भरीव निधीची तरतूद शासन स्तरावरून व्हावी यासाठी सातत्याने माझे प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ मतदारसंघातील प्रलंबित रस्त्याच्या दुरुस्तीसाठी या पुढील काळात आणखी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील खेड्यापाड्यातील सर्वसामान्यांसाठी आवश्यक असलेले रस्ते नक्कीच पूर्ण होतील असा मला विश्वास वाटतो. तब्बल सव्वादोन कोटीच्या या रस्त्यामुळे तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
आमदार यशवंत माने
मोहोळ विधानसभा
0 Comments