शिक्षण महर्षी,दलित मित्र बाळासाहेब कोरके यांचे दुःखद निधन...
वैराग (कटूसत्य वृत्त):- जय जगदंबा परिवाराचे संस्थापक सचिव, शिक्षण महर्षी , दलित मित्र बाळासाहेब नरहरी कोरके यांचे मुंबई येथे मंगळवारी वयाच्या ६३ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक, राजकिय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे......
शिक्षण महर्षी बाळासाहेब कोरके यांचे शिक्षण वैराग येथील विद्यामंदिर हायस्कूल, तडवळे येथील यशवंतराव चव्हाण प्रशाला ,सोलापूर येथील हरीभाई देवकर , बार्शी च्या शिवाजी कॉलेजमध्ये पदवी शिक्षण झाले.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी १९८७ साली जय जगदंबा परिवाराची स्थापना केली.
गोरगरिबांची मुले शिकावित म्हणून बाळासाहेब कोरके यांनी ग्रामीण भागात चार संस्था स्थापन केल्या होत्या . जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था सर्जापुर संचलित ४० शिक्षण संकुले, कालिकामाता शिक्षण प्रसारक मंडळ पानगाव या संस्थेच्या शाखा जय भवानी महिला व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित या संस्थेच्या पाच शाखा, श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठ शाखा, अमर ज्योती विद्यावृंद सोलापूर संचलित एक शाखा आशा एकूण ६३ शाखांच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवली होती.
विविध शैक्षणिक संस्थाचे जाळे राज्यभर पसरवले. म्हणून शिक्षण महर्षी उपाधी त्यांना प्राप्त झाली होती.त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या दलित मित्र पुरस्काराने गौरवण्यात आले होते.केवळ शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवे तर कोरके घराण्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये देखील आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या पत्नी सुरेखा कोरके या जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून कार्यरत होत्या तर सर्जापूर ग्रामपंचायती वर बरेच वर्षे त्यांची सत्ता देखील होती. ते स्वतः राष्ट्रिय कॉग्रेस पक्षाचे बार्शी तालुका अध्यक्ष ही होते. लोकप्रिय माध्यमिक शिक्षक काकासाहेब कोरके यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी मा. जि.प. सदस्य सुरेखा कोरके, मुलगा डॉक्टर कपिल,मुलगी डॉक्टर अमिता, डॉक्टर शितल असा मोठा परिवार आहे.....
0 Comments