सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात 1332 कोरोना पॉझिटिव्ह,2010 झाले बरे, तर 56 मृत्यू
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे सोमवारी सोलापूर शहरात 172 नवे रुग्ण तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1160 नवे रुग्ण आढळून आले असून शहर आणि ग्रामीण भागात काल एका दिवसात 1332 नवे रुग्ण आढळले आहेत.
सोमवारी सोलापूर शहरात 1491 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 172 पॉझिटिव्ह आहेत तर 1319 निगेटिव्ह आले आहेत. आता शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 26910 झाली आहे.
सोमवारी शहरात तब्बल 09 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर शहरात आतापर्यंत 1250 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 24188 जण घरी परतले आहेत. तर 1472 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी ग्रामीण भागातील 5331 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 1160 पॉझिटिव्ह आहेत तर 4171 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 92851 झाली आहे.
सोमवारी तब्बल 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत 1997 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 74265 जण घरी परतले आहेत. तर 16590 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 Comments