अकलूज मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.संतोष खडतरे
सचिवपदी डॉ.नितीन राणे,कोषाध्यक्षपदी डॉ.संजय सिद
अकलूज (कटूसत्य वृत्त):- इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अकलूज शहर अध्यक्षपदी डॉ.संतोष खडतरे यांची तर सचिवपदी डॉ.नितीन राणे,कोषाध्यक्षपदी संजय सिद यांच्या निवडी सर्वानुमते करण्यात आली.
सदर पदग्रहण सोहळ्याची बैठक शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक अकलूज येथे घेण्यात आली. निवडीचे पत्र इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे, पीसीपीएनडीटी महाराष्ट्र राज्य कमिटीचे चेअरमन डॉ.संतोष कुलकर्णी यांचे हस्ते देण्यात आले. या निवडी बरोबरच उपाध्यक्षपदी डॉक्टर सुरेश सूर्यवंशी, डॉक्टर ज्ञानदेव ढोबळे, सहसचिवपदी डॉक्टर विनोद शेटे , शैक्षणिक विभाग प्रमुख पदी डॉक्टर रेवती राणे, क्रीडा सचिवपदी डॉक्टर निनाद फडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीकांत देवडीकर, महिला विभाग पदी डॉक्टर प्रिया कदम, अवयवदान विभाग प्रमुख डॉक्टर मुकुंद जामदार, युवा विभाग पदी डॉक्टर संभाजी राऊत, सदस्यपदी डॉक्टर अभिजीत गांधी, डॉक्टर मानसी इनामदार, डॉक्टर सचिन फडे, डॉक्टर आदिती थिटे, डॉक्टर सुनील नरोटे यांच्या निवडीही याप्रसंगी करण्यात आल्या.
यावेळी यापूर्वी अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेले अकलूजचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.एम के इनामदार,बालरोग तज्ञ डॉ.राजीव राणे, स्त्रीरोग तज्ञ डॉ सतीश दोशी,बालरोग तज्ञ डॉ नितीन एकतपुरे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने आता सर्वांनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे त्याचबरोबर कोरोनाचे नियम पाळून सर्वांनी मास्क वापरला पाहिजे असे मत डॉ.संतोष खडतरे नूतन अध्यक्ष यांनी व्यक्त केले.
0 Comments