Hot Posts

6/recent/ticker-posts

येत्या 1 मे पूर्वी मोहोळ शहरात सुरू होणार अद्यावत डेडिकेटेड कोवीड सेंटर

 येत्या 1 मे पूर्वी मोहोळ शहरात सुरू होणार अद्यावत डेडिकेटेड कोवीड सेंटर



जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या दालनात आमदार यशवंत माने यांची बैठक
शासकीय मुलींच्या वस्तीगृहाच्या नव्या इमारतीत सुरू होणार सेंटर


मोहोळ (साहिल शेख):-येत्या 1 मे पूर्वी मोहोळ शहरात अद्यावत डेडिकेटेड कोवीड सेंटर सुरु होणार असून त्यामुळे कोवीड रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या दालनात आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत जिल्हा आरोग्य प्रशासन आणि मोहोळ तालुक्याचे विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्वरित डेडिकेटेड कोविड सेंटरसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शासकीय मुलींच्या वस्तीगृहाच्या नव्या इमारतीत हे कोवीड सेंटर  सुरू होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती आमदार यशवंत माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीनंतर आमदार यशवंत माने यांनी माध्यमांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. मोहोळ तालुका व शहारासाठी  २५० ते ३५० बेड क्षमता असलेले सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर लवकरच सुरू होणार आहे. मोहोळ शहर आणि तालुक्यातील कोविड रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी आणखी दोन नव्या क्वारंटाईन सेंटरची जागा निश्चित करण्यात आली. तसेच गंभीर रुग्णांना वेळेवर कोवीड सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावे. त्याचबरोबर आवश्यक त्या रुग्णांना व्हेंटिलेटर सुविधा सुद्धा मिळावी यासाठी आमदार माने यांनी येत्या काही दिवसात कोवीड केअर सेंटर सुरू करणार असल्याचे सांगितले.
मोहोळ येथील बैठक संपल्यानंतर आमदार यशवंत माने यांनी तडक जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. सायंकाळी सात वा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या दालनात आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीत मोहोळ तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यामध्ये मोहोळ तालुका व शहारासाठी एक मे पूर्वी समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतीगृहात सर्व सुविधासह सुसज्ज असे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर  सुरू होणार आहे. अशी माहिती आमदार  यशवंत माने यांनी भ्रमणध्वनीवरून बोलताना दिली.
मंगळवार(दि २०)रोजी आमदार  यशवंत माने यांनी पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील , समाज कल्याण विभागाचे सहआयुक्त आडे ,तहसीलदार जीवन बनसोडे,गटविकास अधिकारी गणेश मोरे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे क्षिरसागर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ पाथरुडकर,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गायकवाड जयवंत गुंड बंडू देशमुख यांच्या सह इतर व अधिकाऱ्यां समवेत कोवीड केअर सेंटरच्या संभाव्य जागेची पाहणी केली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,उपनगराध्यक्ष प्रमोद डोके यांच्यासह शासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आता अडीच वाजण्याच्या सुमारास पुण्याचे विभागीय समाजकल्याण आयुक्त आडे  त्याचबरोबर सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी हे मोहोळमध्ये दाखल झाले. कोवीड केअर सेंटरच्या संभाव्य जागांची त्यांनी पाहणी केली.  आमदारांच्या निधीतून एक कोटी रुपये कोवीड  केअर सेंटरच्या उभारणीसाठी आणि कोवीड रुग्णांसाठी खर्च करण्याचे मंजुरी दिल्याने आता आमदार यशवंत माने यांच्या निधीतून एक कोटी रुपयांची साधनसामुग्री या कोवीड सेंटरला मिळणार आहेत.
मोहोळ येथील वाढती कोविड रुग्णसंख्या ध्यानात धरून आणखी दोन नव्या  क्वारंटाइन सेंटरची जागा निश्चित केली असून ते उद्यापासून सुरू देखील होणार आहेत. मोहोळ येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात कोवीड केअर सेंटर सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी लवकरात लवकर मोहोळ येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यासाठी त्वरित पुढील कार्यवाही सुरू करा अशा सूचना सोलापूर आरोग्य विभाग आणि मोहोळ तालुक्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. येत्या आठवड्यात डेडिकेटेड कोविंड सेंटर सुरू होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही.

Reactions

Post a Comment

0 Comments