Hot Posts

6/recent/ticker-posts

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत वेबिनारचे १९ एप्रिल रोजी आयोजन

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत वेबिनारचे १९ एप्रिल रोजी आयोजन

          मुंबई (कटूसत्य वृत्त): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसंदर्भातील माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी 19 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता बेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.

          त्या अनुषंगाने जात पडताळणीबाबतची माहिती उदा. अर्ज कोणत्या प्रकारे भरावे, कोणत्या प्रकारचे दस्तऐवज जोडावे इत्यादीची माहिती सर्वसामान्य लोकांना देणेसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांनी दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता Zoom अॅपद्वारे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केलेले आहे. या  वेबिनारमध्ये समितीचे अध्यक्ष, उपायुक्त व संशोधन अधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत. या  वेबिनारमध्ये सहभागी होणेसाठी खालील लिंक देण्यात येत आहे. तरी सर्व विद्यार्थी, पालक, महाविद्यालयांमधील प्राचार्य कर्मचारी वर्ग व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदवा  असे आवाहन संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मुंबई उपनगर यांनी केले आहे.

Zoom Meeting लिंक खालील प्रमाणे आहे. Topic: Caste Certificate Verification and other helping aspects

Time: April 19, 2021 03:00PM

Join Zoom Meeting

Reactions

Post a Comment

0 Comments