Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात 1719 कोरोना पॉझिटिव्ह,1119 झाले बरे, तर 42 मृत्यू

 सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात 1719 कोरोना पॉझिटिव्ह,1119 झाले बरे, तर 42 मृत्यू

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे शुक्रवारी सोलापूर शहरात 417 नवे रुग्ण तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1302 नवे रुग्ण आढळून आले असून शहर आणि ग्रामीण भागात काल एका दिवसात 1719 नवे रुग्ण आढळले आहेत.    


शुक्रवारी सोलापूर शहरात 2782 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 417 पॉझिटिव्ह आहेत तर 2365 निगेटिव्ह आले आहेत. आता शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 23397 झाली आहे.


          काल शहरात तब्बल 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर शहरात आतापर्यंत 1002 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 18755 जण घरी परतले आहेत. तर 3640 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


          शुक्रवारी ग्रामीण भागातील 10536 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 1302 पॉझिटिव्ह आहेत तर 9234 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 63700 झाली आहे.


          काल तब्बल 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत 1489 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 53445 जण घरी परतले आहेत. तर 8767 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments