Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. संतोष कुमार मस्तूद व डॉ. चित्रा मस्तूद पुरस्काराने सन्मानित

 डॉ. संतोष कुमार मस्तूद व डॉ. चित्रा मस्तूद पुरस्काराने सन्मानित


कुर्डुवाडी ( कटुसत्य वृत्त ) :- रोपळे तालुका माढा येथील डॉ. संतोष कुमार पांडुरंग मस्तुद एम डी एस,ए सी आय. डीपीयू , पुणे. असोसिएट प्रोफेसर, डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांना हॉटेल ऑरकीड, विलेपार्ले, मुंबई येथे  पार पडलेल्या कार्यक्रमात दंतवैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामाबद्दल  'इंडियन हेल्थ प्रोफेशनल अवॉर्डस 2020' व इंटरनॅशनल डेंटल एक्सलेन्स अवॉर्डस 2020' यांच्याकडून 'बेस्ट क्लिनिकल प्रॅक्टिशनर-डेंटल' या विभागात पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच डॉ. चैत्रा संतोषकुमार मस्तुद ,एम डी एस, (पी एच डी) प्रोफेसर, डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, पिंपरी, पुणे , इंडियन हेल्थ प्रोफेशनल अवॉर्डस 2020 दंतव्यंगोपचार या विभागात केलेल्या उत्कृष्ट काम आणि नविन संशोधन बद्द्ल त्यांचा 'एक्सलेन्स ईन क्लीनीकल डेंटल इंनोवशन,ऑर्थोडोंटिक्स व डेंटोफॅसिएल ऑर्थोपेडीक्स'या विभागात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

              हा कार्यक्रम प्रसिध्द हास्य हिंदी अभिनेते जॉनी लिव्हर, हिंदी अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते अली खान, मराठी आणि हिंदी अभिनेते अजित जोग, डॉ.अरुण दोडामनी डॉ. राहुल हेगडे, मेंबर,डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली, डॉ.उज्वल चव्हाण , अतिरिक्त कमिशनर , आय.आर.एस. मुंबई , डॉ. स्वप्नील बंब आणि सुरेखा ढगे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत पार पडला. या पुरस्काराबद्दल त्यांचे  डॉ .पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, डॉ.  भाग्यश्री पाटील , उपकुलपती,  डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त आणि संचालक, डॉ. एन.जे. पवार, कुलगुरु, डॉ. सुर्येकर,कुलसचिव, डॉ. डी गोपालकृष्णन डीन,  यांनी अभिनंदन केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments