Hot Posts

6/recent/ticker-posts

कोणाचेही वीज कनेक्शन न तोडण्याच्याअजित पवार यांच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण - नितीन झिंजाडे

 कोणाचेही वीज कनेक्शन न तोडण्याच्याअजित पवार यांच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण - नितीन झिंजाडे


करमाळा  ( कटुसत्य वृत्त ) :- कोणाचेही वीज कनेक्शन न तोडण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयामुळे राज्यातील वीज ग्राहक व विशेषतः शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे मत राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे यानी व्यक्त केले.
       वीज कनेक्शन कट न करणे व शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याची विनंती  राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक बोके व राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे नेते सोमनाथ लोहार यांच्या मार्फत अजित पवार यांच्याकडे दि.24/02/2021 रोजी केली होती.त्याला यश येत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत वीज कनेक्शन कट न  करण्याची घोषणा केली.
         वीज कनेक्शन कट न करण्याचा निर्णय घेल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिषेक बोके व  सोमनाथ लोहार यांचे अभिनंदन त्यांनी केले आहे. त्यांना पाठवलेल्या अभिनंदन पत्रात त्यांनी म्हटले आहे की,खरोखरच राज्यातील लोकांची वीज कनेक्शन बिल भरण्याची ऐपत नव्हती .वाढत्या महागाईने लोकांचे अक्षरशः कम्बरडे मोडले आहे.यामुळे आज आपण शेतकरी व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा आहे.वीज वितरण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याची गरज आहे.यासाठी आपण लोकहिताचे निर्णय घेत आहात व यापुढेही घ्याल याबद्दल शंका नाही.वीजबिल वसुली बंद होऊन वीजपुरवठा आता सुरळीत होईल याबद्दल शंका नाही.दि.24/02/2021 रोजी मी आपणास पाठवलेल्या पत्रानुसार पहिली मागणी पूर्ण केली आहे.आता अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याची घोषणा आपण करावी ही राज्यातील शेतकऱ्यांची इच्छा आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मर्यादित उत्पन्न लक्षात घेता त्यांना आता मोफत वीज मिळणे ही माफक अपेक्षा आहे असे मत नितीन झिंजाडे यांनी शेवटी व्यक्त केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments