Hot Posts

6/recent/ticker-posts

हुतात्मा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण

 हुतात्मा भगतसिंगराजगुरू आणि सुखदेव यांना  आदरांजली अर्पण


पुणे (कटूसत्य वृत्त) :- थोर क्रांतिकारक  हुतात्मा शिवराम हरी राजगुरूभगतसिंह आणि सुखदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यातील राजगुरुनगर (ता. खेड) येथे आदरांजली वाहण्यात आली. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरेआ. दिलीप मोहिते पाटील,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादखेडचे उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाणगट विकास अधिकारी शरद जोशीतहसीलदार वैशाली वाघमारेप्रतिष्ठानचे अध्यक्ष कोंडिबा टाकळकरसचिव मुकुंद आवटेदेवेंद्र बुट्टे पाटीलभगवान पोखरकरबाळासाहेब कानडेदक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या डॉ. कस्तुरी पायगुडे-राणेपोलिस निरीक्षक सचिन गुरवजिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरगप्रकाश पाटीलप्रकाश वाडेकरराजेंद्र वाळुंजअशोक दुगडहिरामण सातकर आदी उपस्थित होते.


प्रारंभी  शहीदांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यानंतर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळांस भेट देऊन अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments