Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला नगरपरिषदेच्या सुमारे 7 कोटी 37 लाख रूपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता

 सांगोला नगरपरिषदेच्या सुमारे 7 कोटी 37 लाख रूपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता 

लोकनियुक्त नगराध्यक्षा  राणी माने यांच्या पाठपुराव्याला यश 

सांगोला  (कटुसत्य वृत्त ) :-  सांगोला नगरपरिषदेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत एकूण 7 कोटी 37 लाख रूपयांचा निधी मंजुर झाला असून या निधीला सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणी माने यांनी दिली. 

नगराध्यक्षा राणी माने यांनी सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील महत्वाचे कामे सुचविण्यासाठी सांगून ही कामे सर्वसाधारण सभेमध्ये मंजुर करून घेतली. व या कामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी सोलापूर कार्यालयाकडे  वारंवार पाठपुरावा केला होता.
यामध्ये सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत सुमारे 3 कोटी 86 लाख रूपये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सुमारे 3 कोटी 33 लाख रूपये आणि नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सुमारे 18 लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. 
सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत प्रभाग क्र. 1 मध्ये 1) मुलाणी वस्ती हजरत मुलाणी घरासमोरील रस्त्यावर, 2) इन्नुस मुलाणी सर्व्हे नंबर 520 रस्त्यावरा सिडीवर्क करणे.- 2 लाख 58 हजार 697 रूपये, चिचोंली रोड ते गडदेवस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे - 9 लाख 1 हजार 947 रूपये, तेली ताल ते कोपटेवस्ती जाणाऱ्या रस्त्यापर्यंत डांबरीकरण करणे - 15 लाख 27 हजार 795 रूपये, पिंटू प्रभाकर सासणे घर ते सुनिल धतिंगे घर गटार व रस्ता क्रॉंक्रिटीकरण करणे - 13 लाख 35 हजार 750 रूपये, इंदिरा नगर भिवा भोसले ते बागवान घर रस्त्याच्या बाजुस पेव्हींग ब्लॉक टाकणे - 6 लाख 97 हजार 681 रूपये, तेली गल्ली नगरसेवक सुरेश माळी गोडावून ते सार्वजनिक शौचालय पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे - 7 लाख 51 हजार 89 रूपये, भिवा गोडसे घरासमोरील डिपी ते आबा सागर घर ते ओढ्यापर्यंत आरसीसी गटार बांधणे - 19 लाख 57 हजार 773 रूपये, जि.प.शाळा बनकरवाडी व चांडोलेवाडी येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे व मुलांसाठी खेळण्यासाठी साहित्य पुरविणे - 31 लाख 12 हजार 197 रूपये, पोपट केदार घर ते बाबर घर ते सतिश बिडकर घर गटार बांधणे - 13 लाख 74 हजार 946 रूपये, इकबाल मुजावर घर कडलास रोडपर्यंत दक्षिणेबाजूने गटार करणे - 17 लाख 59 हजार 605  रूपये,  श्रीशैल्य फर्निचर दुकान ते परिट गल्ली ते ढोले घर, साळुंखे घर ते पाटील वाडा पर्यंत बंदिस्त गटार करणे -13 लाख 64 हजार 891 रूपये, सदानंद नगर येथे चांदणे घर ते मणेरी घर आरसीसी पाईप गटार करणे - 13 लाख  9 हजार 424 रूपये, भोसलेवस्ती येथून विजय माने यांचे मंगल कार्यालयपर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे - 36 लाख 77 हजार 394 रूपये, पाटील वस्ती कॅनॉल येथे बाळू घोंगडे घर ते उत्तरेस तानाजीकाका पाटील ते शंकर फुले ते अरूण पाटील घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे - 42 लाख 8 हजार 231 रूपये, अलराईनगर सल्लाउद्दीन मुजावर घर ते ईकबाल मुजावर घर रस्ता न्यू इंग्लिश स्कूल येणाऱ्या रस्त्याला जोडणे - 7 लाख 59 हजार 331 रूपये, परिट गल्ली ते गजानन घोंगडे दुकानापर्यंत (मेनरोडपर्यंत) दोन्ही बाजूंनी बंदिस्त गटार करणे - 19 लाख 98 हजार 196 रूपये, मोहन नागणे घर ते संतोष पुणेकर घरापर्यंत गटार व क्रॉंक्रिट रोड करणे - 6 लाख 69 हजार 284 रूपये, जिल्हापरिषद धनगर गल्ली मागील सुतार घरासमोर पेव्हींग ब्लॉक बसविणे - 14 लाख 23 हजार 584 रूपये, भिवा गोडसे घर ते मरीमाई मंदिर आरसीसी गटार बांधणे - 8 लाख 99 हजार 320 रूपये, खरेदी विक्री संघ डिपी ते भोपळे रोड विठ्‌ठल देशपांडे लॉजपर्यंत गटार बांधणे - 12 लाख 37 हजार 734 रूपये, महादेव मंदिराशेजारील सुरवसे, झपके, गुरव, ठोंबरे बोळात पेव्हिंग ब्लॉंक बसविणे -7 लाख 12 हजार 783 रूपये, अरूण जगताप गुरूजी ते चंद्रशेखर दुधणी घर संपूर्ण बोळातील परिसर व डांबरी रस्त्यापर्यंत पेव्हींग ब्लॉंक टाकणे - 5 लाख 70 हजार 752 रूपये, वासुद रोड येथे सपाटे घर ते शिवनेरी निवास गटार बांधणे- 13 लाख 9 हजार 424 रूपये, ब्रम्हचैतन्य नगर येथे अमृतवेल आदलिंगे  निवास आरसीसी गटार करणे - 13 लाख 9 हजार 424 रूपये, यादव घर ते युवराज सावंत घराजवळील गटारीवर स्लॅप टाकणे - 2 लाख 61 हजार 170 रूपये, इंदिरानगर झोपडपट्‌टीमधील अंतर्गत गटार करणे - 14 लाख 91 हजार 982 रूपये, प्रभाग क्र. 5 मध्ये चांडोलेवाडी रोड ते मोहन माळी घर ते शंकर पिसे घर ते ओढ्यापर्यंत क्रॉंक्रिटीकरण करणे - 18 लाख 6 हजार 588  रूपये असे एकूण 3 कोटी 86 लाख 86 हजार 952 रूपये नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजुर झालेले आहे. 
तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारण योजनेअंतर्गत रोहिदास गायकवाड घर ते मधुकर कसबे घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे  - 3 लाख 57 हजार 556 रूपये, विनोद सावंत घर ते धारासिंग ढावरे घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे - 1 लाख 70 हजार 819 रूपये, गौतम बनसोडे घर ते कुुंदन बनसोडे घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉंक बसविणे - 2 लाख 56 हजार 440 रूपये, जया चंदनशिवे घर ते जॉर्ज बनसोडे घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे - 1 लाख 11 हजार 869 रूपये, सार्वजनिक शौचालय ते बलवीर बनसोडे घर रस्ता करणे - 30 लाख 11 हजार 27 रूपये, हणमंत लोखंडे घराजवळील मोकळ्या जागेत पेव्हिंग ब्लॉक बसविणे 11 लाख 17 हजार 741 रूपये, महसुल भवन समोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे - 5 लाख 19 हजार 80 रूपये, खडतरे गल्ली येथील भिमराव गोपीनाथ खडतरे घर ते समाधान खाडे सर घराचे मागील बाजुंपर्यंत गटार करणे - 4 लाख 17 हजार 653 रूपये, वार्ड क्र. 9 मधील खडतरे गल्ली येथे अंतर्गत गटार ते पेव्हिंग ब्लॉंक बसविणे अ) समाज मंदिर ते महिला सभागृह - 5 लाख 99 हजार 620 रूपये, वार्ड क्र. 9 मधील खडतरे येथील अंतर्गत गटारी व पेव्हिंग ब्लॉक बसविणे - ब) कुमठेकर घर ते अस्तित्तात असलेल्या गटारीपर्यंत उजवी बाजू- 7 लाख 15 हजार 939 रू, वार्ड क्र. 9 मधील खडतरे येथील अंतर्गत गटारी व पेव्हिंग ब्लॉक बसविणे - क) कुमठेकर घर ते अस्तित्तात असलेल्या गटारीपर्यंत डावी बाजू- 6 लाख 92 हजार 278 रू, वार्ड क्र. 9 मधील खडतरे येथील अंतर्गत गटारी व पेव्हिंग ब्लॉक बसविणे - ड) स नं 1324 ते स नं. 1320 बोळ- 3 लाख 27 हजार 683 रू, संजय गणपत काटे घराच्या पाठीमागील प्लॉटमधून 40 फुटी रस्त्यास जोडणारा रस्ता व गटार करणे- 28 लाख 77 हजार 718 रू, 40 फुटी रोड ते सतिश कोळी घर रस्ता करणे- 16 लाख 36 हजार 140 रू, बिपीन मोहिते घर ते कांबळे घर रस्ता कॉंक्रीट करणे व आरसीसी गटार करणे - 17 लाख 51 हजार 425 रूपये, रेल्वे लाईन्स पूर्व बाजू रसता ते गाडे यांच्या घरामागून जाणारा रस्ता व गटार करणे - 18 लाख 40 हजार 302 रूपये, जगधने घर ते वाघमारे रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे - 11 लाख 61 हजार 261 रूपये, रेल्वे लाईन पूर्व बाजू पत्रकार वाघमारे यांच्या घराकडे जाणारा बोळ रस्ता कॉक्रिट करणे  - 4 लाख 71 हजार 43 रूपये, रमेश खडतरे ते विजय कांबळे घर रस्ता मुरूमीकरण व खडीकरण करणे - 13 लाख  70 हजार 190 रूपये, वार्ड क्र. 10मध्ये सांगोला महाविद्यालयासमोर  बापूजी नगर येथील  कॅनॉललगत दक्षिणेस भारत पाटील घरापासून सुरवसे घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे - 11 लाख 95 हजार रूपये, दिपक खडतरे - नारळे घर ते वाघमारे सर यांचे घरापर्यत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे - 15 लाख 53 हजार 200 रूपये, बापूजी नगर येथे शिक्षक कॉलणी नंबर 2 येथे सौ. निंबाळकर मॅडम यांच्या घरापासून श्री गणेश चव्हाण यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे - 10 लाख  30 हजार 593 रूपये, दिलीप अंगे घर ते श्री मुल्ला यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे - 21 लाख 41 हजार 160 रूपये, मधुकर डांगे यांच्या घरापासून श्री तांबोळी यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे - 21 लाख 73 हजार 870  रूपये, मोहन गुडदौरू घर ते शिवाजी पवार घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे - 2 लाख 29 हजार 125 रूपये, श्रीनिवास बनसोडे घर ते जगन्नाथ बनसोडे घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे - 4 लाख 91 हजार 598 रूपये, नितीन बनसोडे घर ते विशाल बनसोडे घर रस्ता करणे - 5 लाख 73 हजार 886 रूपये, भिमनगर येथील जुनी प्राथमिक शाळेपासून ते नितीन बनसोडे घर रस्ता डांबरीकरण करणे - 5 लाख 70 हजार 176 रूपये, खडतरे गल्ली समाज मंदीर  ते समाधान बनसोडे घर ते सार्वजनिक शौचालय पर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे - 15 लाख 85 हजार 342 रूपये, खडतरे गल्ली येथे महादेव तुकाराम खडतरे ते दिनकर सिताराम खडतरे घरापर्यंत बंदिस्त गटार करणे - 4 लाख 27  हजार 637 रूपये, खडतरे गल्ली महिला सभागृहाचे मागील सार्वजनिक शौचालयास वॉलकम्पाउंड करणे - 4 लाख 92 हजार 167 रूपये, सुरवसे गुरूजी कवडे घर ते विठ्ठल खडतरे घर रस्ता करणे 15 लाख 21 हजार 561 रूपये अशा एकूण 3 कोटी 33 लाख 91 हजार 99 रूपये निधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारण योजनेअंतर्गत मंजुर झाला आहे. 
त्याचप्रमाणे नागरी दलित्तेतर वस्तीसुधारण योजनेअंतर्गत मकबुल मुल्ला घर ते कडलास रोड गटार करणे - 12 लाख 30 हजार 614 रूपये, सल्लाउद्दीन मुजावर घर ते डिपी रोड पर्यंत गटार करणे - 6 लाख 10 हजार 598 रूपये असा एकूण 18 लाख 41 हजार 212 रूपयांचा निधी मंजुर झालेला आहे. 
या कामांमुळे शहरातील मुलभूत सोयीसुविधा असलेले जवळपास सर्वच कामे पुर्णत्वास नेणार असून सदर कामांचे प्रसिध्दीकरण करून ही कामे लवकरच मार्गी लावले जातील असे आश्वासन यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा  राणी माने यांनी दिले. 
या मंजुरी मिळालेल्या कामांचे श्रेय कुणीही घेऊ नये. ही कामे नियमित वार्षिक निधीमधून मंजूर झालेली आहेत. या कामांसाठी नगराध्यक्षा राणी माने, मुख्याधिकारी केंद्रे व सर्व नगरसेवक यांनी मिळून प्रस्ताव तयार केले व त्याच्या प्रशासकीय मंजूरीसाठी पाठपुरावा केला. यास पाठपुराव्याला यश आले असून त्यासाठी आम्ही प्रशासनाचेही आभार मानतो. 
- सौ. अप्सरा ठोकळे, बांधकाम सभापती सांगोले नगरपरिषद


Reactions

Post a Comment

0 Comments