छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार दैनंदिन जीवनात आणल्यास समाजात आमूलाग्र बदल होईल- संभाजीराजे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एका दिवसापुरती साजरी न करता 365 दिवस साजरी करून प्रत्येकाने जर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार दैनंदिन जीवनात आचरणात आणले तर समाजात खूप मोठा आमूलाग्र बदल होईल असा विश्वास छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीराजे लांबोटी येथे शिवतेज तरुण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सव कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दूध संघाचे माजी संचालक सज्जन पाटील तर प्रमुख पाहुणे दैनिक कटूसत्य व वृत्तदर्पण न्यूज चॅनलचे संपादक पांडूरंग सुरवसे, हॉटेल सुनीलचे मालक कुबेर बापू वाघमोडे, सावळेश्वर ग्रामपंचायत सदस्य राजाराम साठे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मनोज मोरे, शिरापूरचे नाना सावंत, उद्योजक आकाश फाटे, माजी सरपंच राहुल मोरे आदीजण होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस छत्रपती संभाजीराजे यांनी पुष्पहार घातला. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक ब्रह्म चट्टे यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा शाल, श्रीफळ व पुस्तके देऊन सत्कार केला.
याप्रसंगी छत्रपती संभाजीराजे पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास जसा शौर्याचा, धैर्याचा आहे. तसाच तो दानशुर पणाचा देखील आहे. शिवरायांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले तसेच त्यांनी रयतेवर प्रेम देखील केले. शिवाजीराजे जसे कर्तव्यकठोर होते तसेच ते कनवाळू होते आणि रयतेच्या आरोग्याची काळजी घेणारे होते. त्यांनी घालून दिलेल्या शिकवणचा आजही उपयोग आमच्यासारख्या राज्यकर्त्यांना होत असल्याचं त्यांनी शेवटी सांगितले.
याप्रसंगी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन शिंदे, उपाध्यक्ष समाधान व्यवहारे, जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकास जाधव, विलास शिंदे, भारत होनमाने, अमित पाटील, बी.जी. कदम, भागवत गायकवाड, सुरेश व्यवहारे, श्रीरंग गोफने, एकनाथ चट्टे, शहाजी शिंदे, वैभव चट्टे, राहुल चट्टे, ओंकार जाधव, गंगाराम जाधव, शंकर चट्टे, बंडू पाटील, लक्ष्मण रुपनर, संतोष रुपनर, लखन माने, बळी माने, माऊली व्यवहारे, मोहन खताळ आधीसह गावकरी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी कोरोनाबाबत शासनाने घालून दिलेले फिजिकल डिस्टन्स व मास्कचे तंतोतंत पालन करण्यात आले. कार्यक्रमाचे दिमाखादार सूत्रसंचालन गणेश उघडे यांनी केले.
0 Comments