Hot Posts

6/recent/ticker-posts

आई-वडिलांच्या शिकवणीमुळे माणसं मोठी होतात- डॉ. आबासाहेब देशमुख अकलूज

आई-वडिलांच्या शिकवणीमुळे माणसं मोठी होतात- डॉ. आबासाहेब                                                 देशमुख  अकलूज

(कटूसत्य वृत्त):- घरच्या गरीब परिस्थितीमुळे कधी रडलो नाही. ध्येय गाठायचे हा उद्देश मनात होता. आदर करणे आणि आदर घेणे हे आई-वडिलांकडून शिकलो. आई-वडिलांच्या शिकवणीमुळे माणसे मोठी होतात असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांनी केले. शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय अकलूज प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ व गौरव अंक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन कृष्णप्रिया हॉलमध्ये करण्यात आले होतेे. याप्रसंगी प्राचार्य डॉ आबासाहेब देशमुख बोलत होतेे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील या होत्या. यावेळी सचिव अभिजीत रणवरेे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, दीपक खराडेे पाटील, संचालक उत्कर्ष शेटे बाळासाहेब सणस, राजाभाऊ लव्हाळे, तात्या एकपुरे , प्रदीप खराडे पाटील, मठपती भगवान महाराज पुरी, सतीशराव माने, सज्जनराव देशमुख, आदींची प्रमुख उपस्थिती लाभली होती. प्रारंभी सहकार महर्षी काकासाहेब व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवर यांचे हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना प्राचार्य देशमुख म्हणाले की शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयात सेवा करीत असताना माझं दहापट वजन वाढले. कारण बाळ दादांकडून मला खूप सन्मान मिळाला. 
मला मिळालेला त्यांचा पाठिंबा आणि सन्मान हे माझे भाग्य समजतो. मी महाविद्यालय सेवा करीत असताना नोकरी म्हणून कधी कर्तव्य बजावले नाही तर हे माझे घरचे काम समजून मी सेवा केली आणि ही सेवा करीत असताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करीत राहिलो असे देशमुख म्हणालेे. चौकट...देशमुख सरांसारखे प्रामाणिकपणे काम करणारे शाखा अधिकारी आपल्याला मिळाले सरांनी यापुढे गोरगरिबांची मजुरांची दहा-बारा मुले दत्तक घेऊन त्यांना शिक्षण देऊन घडवावे आणि शिक्षणाचा पिंड कायम ठेवावा असे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील हे म्हणाले. चौकट... शब्दांपेक्षा कृती जास्त बोलतेे. सरांचे आणि आमचे नाते कुटुंबासारखे राहिले आहे. सर अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत.अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत मिसळणारे सरांचे व्यक्तिमत्व आहेे. सरांनी महाविद्यालयात पंचवीस वर्षे सेवा केली. सर आज निवृत्त होत असले तरी ते आमच्या मनातून निवृत्त होणार नाहीत असे शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या. यावेळी प्रा. डॉ. विश्वनाथ आव्हाड, प्रा. सावळकर, प्रा. बारगे, तानाजी मगरसर, प्राध्यापक सूर्यवंशी यांचेेेसह शिक्षक, व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments