आ. प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून सोलापूरातील स्पर्धापरिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियोजित MPSC/UPSC सेंटर उपलब्ध

सोलापूर (कटुसत्य वृत्त): सोलापूरातील कष्टकरी यंत्रमाग, विडी व असंघटीत कामगार यांच्या सुशिक्षित मुला-मुलींना उत्तम भवितव्य घडविण्याकरीता स्पर्धात्मक परिक्षांची यशस्वी तयारी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. सोलापूरातील युवक अतिशय कष्टाळू असल्यामुळे त्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन लाभण्याकरीता व तसेच युवक-युवतींना प्रशासकीय सेवेत व विविध स्पर्धात्मक परिक्षांमध्ये यश मिळविण्याकरीता त्यांचे परिपूर्ण अभ्यास व सराव होण्याकरीता अभ्यासकेंद्राची गरज आहे. तसेच कोरोनाच्या काळामध्ये शहरातील वाचनालयामध्ये 40 टक्के विदयार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असल्यामुळे इतर विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत होती. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये होत असणाऱ्या स्पर्धापरिक्षेकरीता विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांनी तुर्त स्वरुपात सोलापूर शहरातील मध्यवर्ती भागात मार्कंडेय जलतरण तलावाशेजारी, पोलीस मुख्यालयाच्या लगत नियोजित MPSC/UPSC सेंटर उपलब्ध करून दिले.
0 Comments