Hot Posts

6/recent/ticker-posts

महिलांमुळे एमआयएमची ताकद वाढणारः शाब्दी रेश्मा मुल्ला यांची महिला जिल्हाध्यक्षपदी निवड

महिलांमुळे एमआयएमची ताकद वाढणारः शाब्दी
 रेश्मा मुल्ला यांची महिला जिल्हाध्यक्षपदी निवड 

          सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात एमआयएमचा विस्तार होत आहे.  युवकांबरोबर आता महिलाही एमआयएममध्ये येत आहेत.  प्रत्येक मतदारसंघात, प्रभागात 50 टक्के मतदान महिलांचे आहे. हेच मतदान निर्णायक असते.  महिला पदाधिकार्‍यांच्या प्रवेशामुळे एमआयएमची ताकद वाढणार असल्याचे प्रतिपादन  शहराध्यक्ष ङ्गारूक शाब्दी यांनी केले.

          बहुजन वंचित आघाडीतून एमआयएममध्ये प्रवेश केलेल्या रेश्मा मुल्ला यांची महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत अनेक महिलांनी पक्षात प्रवेश केला. त्यावेळी शाब्दी उपस्थित पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करत होते.

          ते पुढे म्हणाले की,  शहर मध्यची आमदारकी एमआयएमकडून दोनवेेळा हुकली आहे. आता 2024 मध्ये कोणत्याही परिस्थितीत येथून आमदार निवडून आणायचा आहे. यासाठी महिलांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. त्यासाठी 2022 मध्ये होणारी महापालिका निवडणुकीची सेमीङ्गायनल आपल्याला जिंकायची आहे. पक्षात आता महिलाही सक्रीय होत आहे. वाहेदा भंडाले, रेश्मा मुल्ला यांनी आता जास्तीत जास्त महिलांना एमआयएमचे विचार पटवून द्यावेत. या महिलांमुळे एमआयएमला बळीकटी मिळाली आहे, असेही शाब्दी म्हणाले. यावेळी रेश्मा मुल्ला यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

          यावेळी नगरसेवक काझी जहागिरदार, नगरसेविका वाहेदा भंडाले, मेडिकल आघाडी जिल्हाध्यक्ष महजर कुरेशी, वाहतूक जिल्हाध्यक्ष रियाज सय्यद,  कामगार जिल्हाध्यक्ष शकिल शेख, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष इस्माईल नदाफ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते. 

Reactions

Post a Comment

0 Comments