Hot Posts

6/recent/ticker-posts

निवडणूक टाळण्यासाठी नगरपालिकेत रूपांतर करायचे नव्हते- रणजितदादा

निवडणूक टाळण्यासाठी नगरपालिकेत रूपांतर करायचे नव्हते- रणजितदादा

          अकलूज (कटूसत्य वृत्त): अकलूज ग्रामपंचायतीची निवडणूक टाळण्यासाठी नगरपालिकेत रूपांतर करायचे नव्हते तर अकलूज गावच्या विकासासाठी नगरपालिकेत रूपांतर करायचे होते असे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले.

          अकलूज ग्रामपंचायत व संग्रामनगर ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराचा शुभारंभ अकलूज येथील पाटील वाड्याच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील बोलत होते. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील,सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील,किशोरसिंह माने पाटील, संग्रामसिंह मोहिते पाटील, ऋतुजादेवी मोहिते-पाटील, जि. प. सदस्य स्वरूपाराणी मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, धनंजय देशमुख, श्रीराज माने पाटील, राजवर्धनी माने पाटील, दादा मोरे,विठ्ठल गायकवाड, शिवसेनेचे दत्ता पवार, अण्णा कुलकर्णी, आरपीआयचे किरण धाईंजे, गरिबदास गायकवाड, सचिन लोंढे, भागवत गायकवाड, चंद्रकांत कुंभार, व दोन्ही ग्रामपंचायतीचे उमेदवार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          पुढे बोलताना आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले की अकलूज ग्रामपंचायतीला ९९ वर्षे झाले, अकलूज गाव हे आपल्या पूर्वजांनी उभे केले आहे. नगरपालिकेमुळे गावाचे कल्याण झाले असते. गरीब माणसांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाले असते. त्यांच्या संसाराची प्रगती झाली असते.खालच्या पातळीवर जाऊन भाषणे केली ते सहन केले. परंतु गावावर प्रश्न उपस्थित केला गेला तर ते अजिबात सहन करणार नाही असे म्हणून ते धैर्यशील मोहिते-पाटील यांना म्हणाले भैय्या आपण लोकांची सेवा करतो!आपल्याला लोकांची, आपल्या गावाची सेवा करायची आहे. आपण संन्यास घ्यायचा नसतो.

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राजकीय संन्यासाचा निर्णय मागे घेतला..
          यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले मोठे दादांनी,बाळदादांनी रणजित दादांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली होती.राजकारण करीत असताना नैतिकता ठेवले पाहिजे ते मी केले. पॅनल प्रमुख या नात्याने माझी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. परंतु मोठे दादा, बाळदादा  रणजीतदादा यांचेसह हजारो कार्यकर्त्यांनी व मोहिते-पाटील कुटुंबातील सर्वांनी निर्णय मागे घेण्यास सांगितले. जिल्ह्यातील तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी शिवरत्न बंगल्यावरती येऊन आपण निर्णय मागे घ्यावा म्हणून उपोषण केले.थोरल्या आईसाहेब यात सहभागी झाल्या. त्यामुळे आपण निर्णय बदलला असून यापुढे आणखी जोमाने कामाला लागु व सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करू असे म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments