राज्यसेवा आयोगाच्या परीक्षांच्या कमाल संधीच्या निर्णयाचा पुर्नविचार करावा - भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली मागणी

अकलूज (कटूसत्य वृत्त): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यां करीता संधीची मर्यादा घातलेली आहे फक्त सहा वेळा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी आहे. आयोगाने घेतलेला निर्णय मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता अन्यायकारक आहे हा निर्णय दुर्दैवी असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने चिंता व्यक्त करणारा आहे.त्यामुळे या संधीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सध्या मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात असताना परीक्षेसाठी कमाल संधीची मर्यादा लादणे हे कोणत्या न्यायात बसते ? महाविकास आघाडी सरकार मराठा समाजच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे.
राज्यसेवा आयोगांच्या परीक्षेच्या अनिश्चित तारखा, त्यांचे वेळेवर न निघणारे निकाल,प्रशासनात आवश्यकता असताना देखील कमी पदभरतीच्या जाहिराती, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा शुल्क युपीएससीच्या तुलनेने चार ते पाच पट जास्त घेते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सतराशे साठ प्रश्न असताना कमाल मर्यादांची संधी घालून महाराष्ट्र शासन काय साध्य करू इच्छिते?
लाखो विद्यार्थी आपले प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन जिद्दीने प्रयत्न करत असतात त्यात यश येत असते थोडक्यात अपयश पदरी पडत असते विद्यार्थी पुन्हा नव्या उमेदीने प्रयत्न करत असतात मात्र संधीच्या मर्यादा मुळे विद्यार्थ्यांवर कमालीचे दडपण येणार आहे विद्यार्थ्यांना तणाव मुक्त निकोप स्पर्धैची समान संधीची गरज आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार स्वायत्त असला तरी अयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राज्य सरकारच्या माध्यमातून होत असते त्यामुळे संधीच्या मर्यादेच्या आयोगाने घेतलेल्या निर्णायाकडे राज्य सरकार डोळेझाक करू शकत नाही राज्य लोकसेवा आयोगाचे एकूण सहा सदस्य असतात त्यापैकी तीन जागा रिक्त आहेत फक्त तीन सदस्य असलेल्या आयोगाच्या मनमानी कारभारामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये राज्याचे प्रमुख व मुख्यमंत्री म्हणून आपण समान संधी या न्यायाने तात्काळ दखल घ्यावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे भाजपा नेते धैर्यशील मोहीते पाटील यांनी केली आहे.
0 Comments