पीक कर्जासाठी करा बँकेशी संपर्क शेतकऱ्यांना जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हास्तरीय बँक प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये बँकांनी पीक कर्जाचा लक्षांक पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या असून शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रासह संबंधित बँक शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्याला 2020-21 या रब्बी हंगामातील पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांना 2256.59 कोटी रूपये, जिल्हा मध्यवर्ती बँक 280.71 कोटी रूपये आणि ग्रामीण बँकेला 75.19 कोटी रूपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. लक्षांक पूर्ण करण्याबाबत बँकांनी तत्काळ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना शंभरकर यांनी दिल्या आहेत.
पीक कर्ज उपलब्ध होण्याबाबत अडचणी असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदार, सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहनही भोळे यांनी केले आहे.
0 Comments