कोविड सेंटरच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करावी यासाठी लक्षवेधी सेनेचे बेमुदत थाळीनाद आंदोलन

अकलूज : अकलूज मधील कोविड सेंटरच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी लक्षवेधी सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अनिल साठे व उपाध्यक्ष अमित भिंगारदिवे यांनी अकलूजमधील आण्णाभाऊ साठे यांच्या स्मरकासमोर बेमुदत थाळीनाद आंदोलन सुरू केले असून सदर आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाला भागवत गायकवाड दलित मित्र पुरस्कार, विजय काका कुलकर्णी, बहुजन ब्रिगेड अपंग सेलचे तालुका अध्यक्ष, कुसुम कांबळे, सुरेश भाऊ गंभीरे सन्मित्र संघ तालुका अध्यक्ष, धवल कांबळे इरफान बागवान यांनी पाठिंबा व भेट दिली.
उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या कार्यालयासमोर दिनांक 2 डिसेंबर 2020 रोजी थाळीनाद आंदोलन करण्यात आले होते,त्याची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी सौ शमा पवार यांनी अकलूज येथील कोविड सेंटरची चौकशी करण्यासाठी माळशिरस तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी श्री डॉ मोहिते यांची नेमणूक केली होती, मात्र डॉ मोहिते हे या चौकशीच्या अनुषंगाने वेळकाढू पना करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे,त्याच पद्धतीने या प्रकरणाची चौकशी सुरू झाली नसल्याने व पुन्हा अकलूज कोविड सेंटरची चौकशी करून त्वरित कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी लक्षवेधी सेनेच्या वतीने अकलूजमधील साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मरकासमोर बेमुदत थाळीनाद आंदोलन सुरू केले आहे, जोपर्यंत चौकशी करून संबंधित दोषी असणाऱ्यावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आंदोलन थांबविणार नसल्याचे लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे व उपाध्यक्ष अमित भिंगारदिवे यांनी सांगितले.
0 Comments