कोरोना आजाराने निधन झालेल्या सर्वांना विधान परिषदेत आदरांजली

मुंबई, (कटूसत्य. वृत्त.): कोविड-19 च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्यात, देशात आणि संपूर्ण जगात कोविड योद्धा म्हणून कार्य बजावत असताना शहीद झालेल्या आणि या आजाराने निधन झालेल्या सर्वांना विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आदरांजली अर्पण केली.
मार्च 2020 पासून कोरोनाच्या जागतिक महामारीचे संकट आपल्यासमोर उभे आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरीने प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असेही सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
0 Comments