Hot Posts

6/recent/ticker-posts

जानेवारी महिन्याचे नियतन प्राप्त

जानेवारी महिन्याचे नियतन प्राप्त

सोलापूर, (कटूसत्य. वृत्त.)राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाठी जानेवारी 2020 या महिन्याचे सोलापूर शहरासाठीचे गहूतांदळाचे नियतन प्राप्त झाल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अनिल कारंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.  

अंत्योदय अन्न योजनेत 6 हजार 869 शिधापत्रिका असून गहू प्रती कार्ड 25 किलोप्रमाणे 1717.25 क्विंटल तर 686.90 क्विंटल तांदळाचे प्रती कार्ड 10 किलो नियतन मंजूर झाले आहे.  प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या 5 लाख 24 हजार 261 एवढी असून गहू प्रती लाभार्थी 3 किलोप्रमाणे 15180 क्विंटल तर तांदूळ प्रती लाभार्थी 2 किलोप्रमाणे  10120 क्विंटल धान्य प्राप्त झाल्याची माहितीही श्री. कारंडे यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments