शेतकरी कायद्याविरोधात करमाळ्यात सर्वपक्षीय एल्गार ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

करमाळा (कटूसत्य. वृत्त.): दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी च्या आदोंलनला पाठींबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी आज काँग्रेस आय,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना, शेतकरी संघटना मित्र पक्ष हमाल पंचायत यांनी करमाळा बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार आज शंभर टक्के करमाळा बंद पाळण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत, शिवसेना ता प्रमुख सुधाकर लावंड, शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख दशरथराव कांबळे,हमाल पंचायत चे अध्यक्ष अॅड राहुल सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शिवराज जगताप, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण कटारिया, शिवसेनेचे संजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ता.अध्यक्ष संतोष वारे, कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, राष्ट्रवादी महीला आघाडीचे अॅड सविता शिंदे, नगरसेवक सचिन घोलप, विजय लावंड, सचिन गायकवाड , विजयमाला चवरे शेतकरी संघटनेचे रविद्र गोडगे, संजय शिलवंत, सचिन काळे, राहुल पवार ,अमोल यादव, आण्णा सुपनवर, अभिषेक आवाड. भिमदल चे सुनील भोसले, माजी नगरसेवक फारूक जमादार,बाळासाहेब क्षीरसागर,नगरसेवक संजय सावंत,नगरसेवक अतुल फंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आझाद शेख, भोसे चे सरपंच भोजराज सुरवसे, राजेंद्र काळे आदी उपस्थित होते. व्यापारी, अडते,शेतकरी आदी सर्वांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला.
यावेळी बहुसंख्येने शेतकरी अभिजीत सावंत, देवा लोंढे, फारूक बेग, डाॅ अमोल दुरंदे ,सूर्यकांत सामसे, बापु उबाळे, बाळासाहेब रोडे, नागेश उबाळे, शुभम बनकर आदी उपस्थित होते .
0 Comments