Hot Posts

6/recent/ticker-posts

सिद्धरामेश्वराच्या यात्रेमधील धार्मिक विधीबाबत, आयुक्तांना भेटले शिष्टमंडळ, उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिल्या आयुक्तांना सूचना

सिद्धरामेश्वराच्या यात्रेमधील धार्मिक विधीबाबत, आयुक्तांना भेटले शिष्टमंडळ, उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिल्या आयुक्तांना सूचना

          पुणे (कटूसत्य वृत्त):- येथील विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे कार्यालयात सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या (गड्डा) यात्रेतील महत्त्वाच्या धार्मिक विधी व इतर महत्त्वपूर्ण निर्णयासाठी भेटीत सकारात्मक चर्चा पार पडली.

          यावेळी शिष्टमंडळात आ. संजयमामा शिंदे, आ. विजयकुमार देशमुख, यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष जुबेर बागवान, विलास लोकरे मामा, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष मिलिंद गोरे, अमित रोडगे, अजित शेडजाळे, सचिन कुलकर्णी आदी.

          राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचेकडून फोन आल्यानंतर सोलापूर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांचेकडून राव यांनी प्राथमिक माहिती घेतली होती. तसेच आज शिष्टमंडळाच्या सोबतच चर्चेदरम्यान पण यात्रेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली व उद्या सोलापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्त यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे करून यात्रेतील धार्मिक विधी बाबतचा निर्णय घेतो असे सौरभ राव यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments