सहयाद्री फार्मसी कॉलेज येथे एम. फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

सांगोला (कटूसत्य. वृत्त.): सह्याद्री फार्मसी कॉलेज येथे एम फार्मसी प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज दिनांक १०/१२/२० ते १६/१२/२० पर्यंत बी. फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर (एम. फार्मसी), प्रवेशाकरीता अर्ज ऑनलाईन पध्दतीने दिनांक १०/१२/२०२० ते १६/१२/२०२० दरम्यान स्विकारले जाणार आहेत. तरी विद्यार्थ्यांनी अचूक ऑनलाईन फॉर्म भरुन व मूळ कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन रजिस्ट्रेशन करावे.
कोरोनाच्या वैष्विक महामारी मुळे प्रवेश प्रक्रीया उशीरा सुरु होत असून शासनाने विद्यार्थ्यांपुढे इतर कुठेही न जाता घरी बसून ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा पर्याय ठेवला आहे . रजिस्ट्रेशन झाल्यावर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पध्दतीनेच कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती होणार आहे. याच बरोबर रजिस्ट्रेशन शुल्क खुला प्रवर्गासाठी १००० / - रुपये व मागास प्रवर्गासाठी ८०० / - रुपये ऑनलाईन किंवा एटीएम द्वारे भरणा करायचे आहेत. याचबरोबर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बाबत पालक व विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या विविध शंका व अडचणी याबाबत सखोल मार्गदर्शन या महाविद्यालयात अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांमार्फत उपलब्ध होणार आहे. तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलिपकुमार इंगवले सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील यांनी केले आहे. याबाबत अधिक माहीतीसाठी प्रा. ए. एम. तांबोळी ( ९९ ७५४०२४६५ ) व श्री. पी. एस. लोखंडे ( ९ ८२३१०७३७१ ) यांच्याशी संपर्क साधावा.
0 Comments