Hot Posts

6/recent/ticker-posts

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा – राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा – राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम


मुंबई, (कटुसत्य. वृत्त.): महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध तसेच सफाई कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राबविण्यात याव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम  यांनी दिले. 

राज्यमंत्री डॉ.कदम यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची आढावा बैठक झाली. यावेळी डॉ. कदम म्हणाले की, गरजू घटकांचा विचार करून महात्मा फुले महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आखणी करावी. तसेच या योजनांची एकत्रित माहिती तयार करून ती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. प्रत्येक जिल्ह्यातील योग्य पात्र लाभार्थी निवडून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांना होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्यक्ष लाभार्थींची संख्या वाढवून वंचित घटकांच्या जीवनमानामध्ये आमूलाग्र बदल होण्यास मदत होईल. 

यावेळी महामंडळातंर्गत राबविण्यात येणारे विविध नविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम, 50 % अनुदान योजना, बीज भांडवल योजना, महिला समृद्धी, महिला किसान योजना, उच्च शिक्षण कर्ज योजना आदी योजनांना गती देण्यात यावी. तसेच तसेच महामंडळाच्या माध्यमातून वंचित घटकांपर्यंत प्रत्यक्ष योजनांचा लाभ पोहोचवावा, असेही डॉ.कदम यावेळी म्हणाले. या बैठकीमध्ये महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रम व योजनासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव एस. जे. पाटील. तसेच व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गेडाम, उपमहाव्यवस्थापक सॅमसन जाधव, उपमहाव्यवस्थापक सौदामिनी भोसले आदीसह संबंधित विभागाचे तसेच महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments