संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना मासिक मानधन व दिवाळी निमित्त पाच हजार रुपये आर्थिक मदत दिवाळीपूर्वी देण्याची मागणी
करमाळा (क. वृ.):- सध्या महाराष्ट्रभर कोरोना माहामारीने थैमान घातले आहे.त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे नियमित मानधन तसेच दिवाळीनिमित्त 5000 रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय कक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
इ मेल द्वारे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांच्याकडे केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोरगरीब कुटुंबे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत.सध्याच्या कोरोनाच्या परिस्थिती मधे बहुसंख्य लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. कामधंदा नसल्याने हलाखीच्या परिस्थितीत आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत.म्हणून आपल्या स्तरावरुन संजय गांधी निराधार योजनेतील श्रावणबाळ,परितक्ता,दिव्यांग,
दुर्धर आजारग्रस्त रुग्ण यासह निराधार योजनेतील असलेल्या महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना चालू मानधनासोबत दिवाळी बोनस म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये एवढी आर्थिक मदत वितरित करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे करमाळा तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी केली आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंझाडे,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे,
शहर अध्यक्ष ओंकार पलंगे, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष अतुल वारे पाटील आदींच्या सह्या आहेत.
0 Comments