डिसेंबर महिन्याचे नियतन प्राप्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 23, 2020

डिसेंबर महिन्याचे नियतन प्राप्त

                डिसेंबर महिन्याचे नियतन प्राप्त

        सोलापूर (क.वृ.) : -राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाठी डिसेंबर 2020 या महिन्याचे सोलापूर शहरासाठीचे गहू, तांदळाचे नियतन प्राप्त झाल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अनिल कारंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.  

          अंत्योदय अन्न योजनेत 6 हजार 235 शिधापत्रिका असून गहू प्रती कार्ड 25 किलो प्रमाणे 1558.75 क्विंटल तर 623.50 क्विंटल तांदळाचे प्रती कार्ड 10 किलो नियतन मंजूर झाले आहे.  प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या 4 लाख 91 हजार  एवढी असून गहू प्रती लाभार्थी 3 किलो प्रमाणे 14730 क्विंटल तर तांदूळ प्रती लाभार्थी 2 किलो  प्रमाणे  9820 क्विंटल धान्य प्राप्त झाल्याची माहितीही कारंडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages