Hot Posts

6/recent/ticker-posts

निर्भिडपणे मतदान करा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

निर्भिडपणे मतदान करा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

सोलापूर, (क.वृ): महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबर 2020 रोजी होत आहे. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनास किंवा दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी  तथा पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

मतदान सकाळी 8 ते सायकांळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. मतदान प्रक्रियेमध्ये अपात्र असणाऱ्या व तोतयागिरी करणाऱ्या बनावट व्यक्तींवर प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे. एखादी व्यक्ती बनावट मतदान करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळल्यास भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. राव यांनी सांगितले.

मतदानासाठी खालील कागदपत्रे पात्र आहेत.

  • मतदान ओळखपत्र
  • आधार कार्ड.
  • वाहनचालक परवाना.
  • पॅन कार्ड
  • पारपत्र
  • केंद्र/राज्य शासन/सावर्जनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी औद्योगीक संस्था यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र.
  • खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र.
  • संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असणाऱ्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र.
  • विश्वविद्यालयाद्वारे वितरीत पदवी/पदवीका मूळ प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत कलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र.

Reactions

Post a Comment

0 Comments