Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवतेजसिंहांच्या हस्ते कारभारी लयभारी या मालिकेचा शुभारंभ

शिवतेजसिंहांच्या हस्ते कारभारी लयभारी या मालिकेचा शुभारंभ



    अकलूज (क.वृ) ;- सांस्कृतिक क्षेत्राला सतत सहकार्याची भूमिका करणाऱ्या अकलूजच्या चैतन्यमय नगरीत कारभारी लय भारी या मराठी मालिकेचे चित्रीकरण सुरू असून नुकताच या मालिकेचा शुभारंभ व प्रमोशन समारंभ अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मालिकेतील प्रमुख कलाकार निखिल चव्हाण, अनुष्का सरकटे व त्यांची टीम उपस्थित होते.

    वाघोबा प्रोडक्शन तेजपाल वाघ यांच्या लेखणीतून झी मराठीवर सुरू झालेली कारभारी लयभारी या मराठी मालिकेचे चित्रीकरण अकलूजच्या पर्यटन स्थळे होत आहे .झी मराठीवर या मालिकेची दमदार सुरुवात झाली असून अकलूजचे कलाकारही वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसत आहेत. प्रमोशन समारंभावेळी अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज मध्ये सदर मालिकेचे चित्रीकरण होत असल्यामुळे आनंद व्यक्त करीत कारभारी लयभारीच्या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या. या मालिकेतील प्रमुख कलाकार निखिल चव्हाण म्हणाले की मला अभिमान वाटतो की अकलूजमध्ये चित्रीकरण होत आहे. अकलूजचे आणि माझे नाते गेले पाच वर्षाचे आहे.अनेक महिने वर्ष अकलूज मध्ये चित्रीकरण करणार आहे. धैर्यशील मोहिते-पाटील व शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या सहकार्यामुळे आम्ही अकलूजमध्ये चित्रीकरण करू शकलो असे ते म्हणाले. यावेळी मालिकेतील प्रमुख कलाकार अनुष्का सरकटे यांनीही आपले विचार व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments