शिवशंकर बझारकडून पणती व रांगोळीच्या स्टॉलची स्वतंत्र उभारणी
सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
अकलूज : ना नफा ना तोटा तत्वावर कार्यरत असणार्या शिवशंकर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्थेच्या ‘शिवशंकर बझार’ येथे खास दिवाळी सणासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सींगचे सर्व नियम पाळून पणती व रांगोळीच्या स्टॉलची स्वतंत्र उभारणी करण्यात आली असून याचा शुभारंभ सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या आशिर्वादाने व उद्योगमहर्षि कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतू 25 वर्षापूर्वी सुरू झालेला शिवशंकर बझार चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली व किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील यांच्या ध्येयधोरणातून यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी पणती व रांगोळीचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले आहेत. शिवाय ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देऊन अत्यंत माफक दरात विविध प्रकारच्या गृहपयोगी वस्तूंचीही वेगवेगळ्या स्टॉलच्या माध्यमातून 5 ते 50 टक्क्यांपर्यंत सूट देत विक्री करण्यात येत आहे. अकलूजच्या मुख्य शाखेबरोबरच तालुक्यातील इतर 8 शाखेतही कोरोनाचे सर्व नियम पाळून विक्री करण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख यांनी दिली.
यावेळी व्हा.चेअरमन अर्जुनराव भगत, संचालक अॅड.नितीनराव खराडे, विजयकुमार दोशी, नारायण फुले, मदन भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments