धाडसी लोकनेता हरपला पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची श्रद्धांजली


सोलापूर, (क.वृ): पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील जनतेप्रती आमदार भारतनाना भालके यांचे प्रेम होते. विधीमंडळात सामान्यांचे प्रश्न ते पोटतिडकीने मांडून न्याय मिळवून देत. सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी नेहमी झगडणारा धाडसी लोकनेता हरपला, अशा शब्दात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
श्री. भरणे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, ‘आमदार भारतनाना भालके आणि आम्ही विधानसभेत एकत्र काम करीत होतो. मतदारसंघातल्या गावागावात, घराघरात त्यांचा जनसंपर्क होता. मतदारसंघातील दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासाठी ते सतत कार्यरत होते. लोकांच्या विकासासाठी ते तळमळीने काम करीत होते. शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी ते नेहमीच सर्वांच्या पुढे असायचे. त्यांच्या जाण्याने सोलापूर जिल्ह्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. एक धाडसी लोकनेता हरपल्याचे आम्हाला दु:ख आहे.’
0 Comments