Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोखरापूरच्या विठ्ठल-बिरुदेवाची यात्रा रद्दचा ग्रामस्थांचा निर्णय

 कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोखरापूरच्या विठ्ठल-बिरुदेवाची यात्रा रद्दचा ग्रामस्थांचा निर्णय



मोहोळ (क.वृ):- कोविड -१९ च्या पोखरापूर प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशाचे पालन करून पोखरापूर तालुका मोहोळ येथील दिवाळी पाडव्याच्या दिवशी होणारी विठ्ठल-बिरुदेवाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय पोखरापूरच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.पाडव्याच्या दिवशी देवाची पूजा व परंपरागत विधी करण्यास फक्त दहा जणांना मान्यता द्यावी अशी मागणी पुजारी मंडळींनी मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत केली.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी उपस्थितांना यात्रेबाबत मार्गदर्शन केले. शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार साधेपणाने केवळ दहा व्यक्तीच्या उपस्थितीत देवाची पूजाअर्चा करावी, मंदीराचा दरवाजा कुलूप बंदच राहील. मंदीराकडे जाणा-या वाहनांना प्रवेश नाही,  त्यामुळे १५नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या तीन दिवशी  मंदीराकडे जाणारा मार्ग बंद राहतील.नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. मंदीर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे,असे मोहोळ पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी बैठकीत बोलताना सांगीतले. या गर्दीच्या दिवशी विठ्ठल-बिरुदेवाचे मंदीर बंदच राहणार आहे.पोखरापूर गावातून भागूबाईची पालखी व छबीना निघणार नाही.त्याऐवजी वाहनातून मुर्ती, पादुका नेण्यात येणार आहेत.यास सर्वांनी मान्यता दिली.  यावेळी निवासी नायब तहसीलदार सुरेश गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड, पोलीस हवालदार निलेश देशमुख,प.स. सदस्या सौ.सिंधूताई वाघमारे, देवस्थान ट्रस्टचे यशवंत नरुटे,सरपंच चेतन नरुटे, पोलीस पाटील सौ.संगीता समाधान पाटील, बाबासाहेब दळवे-पाटील, हर्षद दळवे, श्रीधर उन्हाळे,आशिष आगलावे, अंबादास माने, राजकुमार दळवे,अनिल कदम, सालकरी मधुकर वाघमोडे पुजारी, सोमनाथ वाघमोडे, नानासाहेब वाघमोडे, धनंजय वाघमोडे, हणमंत वाघमोडे पुजारी,अरुण भोसले, पांडुरंग वाघमोडे, लक्ष्मणराव वाघमोडे, धोंडिराम लेंगरे,ग्रामसेवक दादाराव वाघमारे, पांडुरंग लेंगरे, विक्रांत बाबर, आदि बैठकीस उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments