Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा जागर मोर्चा कार्यक्रमास खा. संभाजी राजे उपस्थितीत राहणार - नगराध्यक्ष रोचकरी

मराठा जागर मोर्चा कार्यक्रमास खा. संभाजी राजे उपस्थितीत राहणार - नगराध्यक्ष रोचकरी

तुळजापूर, दि.५(क.वृ.):- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्य पावन नगरीत शुक्रवार दि.9 रोजी सकल मराठा समाजाचा वतीने काढण्यात येणाऱ्या मराठा आरक्षण मोर्चास छञपती खासदार संभाजी राजे यांनी  उपस्थिती  राहणार असल्याची माहीती संयोजक तथा नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सोमवार दि.5 रोजी नगरपरिषद कार्यालयात  नगरसेवकांची घेण्यात आलेल्या बैठकीत दिली.

मराठा आरक्षण मोर्चा संदर्भात नगरपरिषद नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत  शुक्रवार दि.9 रोजी होणाऱ्या ठोक मोर्चा व जागर कार्यक्रम  शासनाचे सर्व नियम, अटी ला अधीन राहून व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून  पार पडण्यासाठी सगळ्यांनी परिश्रम घेण्याचे ठरले. तसेच सदरील मोर्चा मध्ये छत्रपती खासदार संभाजी राजे भोसले हे स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती मा. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिल्या ची माहीती नगराध्यक्ष सचिन यांनी यावेळी दिली. सदरील या पुर्वी मराठा समाजाचा झालेल्या मोर्चाला साजेसा निघण्यासाठी  मोर्चा शिस्तप्रिय नियोजनबद्ध शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी यांनी केले आहे. या वेळेला सर्व नगरसेवक उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments