Hot Posts

6/recent/ticker-posts

वाणीचिंचाळे येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ज्वारी प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

वाणीचिंचाळे येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ज्वारी प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

सांगोला दि.८(क.वृ.): सध्या समाधानकारक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे सर्व गावातील शिवारात ज्वारी पेरणीसाठी लगबग सुरू आहे. यामुळेच कृषी विभाग तत्पर झाला आहे. कृषी विभागाच्या वतीने ज्वारी बियाणे वाटप व प्रात्यक्षिक कार्यक्रम कोरोनाच्या काळात सोशल डिस्टंन्स पाळुन घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना ज्वारी पिकावर करणारी बिजप्रक्रिया तसेच नवीन जाती,खतव्यवस्थापन व रोग व किडी याविषयी अतिशय मौलिक मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. सरपंच शंकर गडहिरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा कृषी सहाय्यक तळेकर साहेब यांनी केले. यावेळी जवळा मंडळचे कृषी अधिकारी मा भंडारे साहेब यांनी शेतकऱ्यांना ज्वारी उत्पादन घेताना पंचसुत्री तंत्राचा अवलंब करावा असे सांगितले. तसेच मालदांडीपेक्षा अधिक उत्पादन देणाऱ्या जातीचा आपल्या शेतीमध्ये वापर करावा असे सांगितले.

तसेच कृषी सहाय्यक सरगर साहेब यांनी गावातील लाभार्थ्यांनी ज्वारी प्रात्यक्षिकाबद्दल अतिशय सविस्तर माहिती दिली. तसेच गावातील शेतीविषयक बाबीविषयी कायमस्वरूपी कृषी विभाग तत्पर राहील याची हमी दिली. यावेळी लाभार्थ्यांच्या शेतात पेरणी कशी करावी ,खते कशी दयावीत असे प्रत्यक्ष क्षेत्रावर दाखवून दिले. यावेळी गावातील कृषी विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी ,उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments