Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यापीठ आवारात अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवा मंत्री उदय सामंतकडे शिवसेनेची मागणी

विद्यापीठ आवारात अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवा मंत्री उदय सामंतकडे शिवसेनेची मागणी

सोलापूर दि.९(क.वृ.):- सोलापूर विद्यापीठास राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी शिवसेनेने आक्रमक आंदोलने केली आहेत, आता या विदयापीठात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशा आशयाच्या मागणीचे निवेदन सोलापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने राज्याचे उच्चशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांना देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, नगरसेवक अमोल शिंदे, राज पांढरे (दुधाळ), योगेश क्षीरसागर, सौरभ भोसले, महेश खुर्द, विशाल चंदेले, समीर लोंढे, गजानन केंगनाळकर, आमीर मुजावर आदी उपस्थित होते. 

अहिल्यादेवी होळकर यांनी धर्म प्रसाराच्या कार्या बरोबरच शिक्षणासाठी महत्त्वाचे योगदान दिले असून स्त्री योध्दा म्हणून सर्व समाजाला त्या प्रेरणास्थानी आहेत. विदयापीठाच्या आवारात अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा उभारला जावा ही सर्व स्तरातून मागणी आहे. तरी त्वरीत मान्यता देऊन तरतूद करण्यात यावी अशी मागणी सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे.

धनगरी घोंगडी पांघरूण सत्कार
शिवसेनेच्यावतीने उदय सामंत यांना मानाचा पिवळा फेटा बांधून आणि धनगरी घोंगडी खांद्यावर पांघरुण सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, युवराज माने, शाम गांगर्डे व मिलिंद गोरे हे सुध्दा उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments