सोयाबीन चे खळे रस्त्यावर ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 1, 2020

सोयाबीन चे खळे रस्त्यावर !

सोयाबीन चे खळे रस्त्यावर !

तुळजापूर दि.१(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यात गेली पंधरा दिवसांपासून धुवादार पाऊस बरसल्याने  शेतात पाणी साचले गेले. गेल्या दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन काढुन ते खळे करण्यासाठी चक्क रस्ते व बायपास रस्त्यावर आणुन ढीग रचले असल्याने चक्क आता खळे रस्त्यावर करीत आहेत. सध्या रस्त्यावर काढलेल्या सोयाबीनचे ढीग रचणे वाळवणे व रस्त्यावर भरडणे व पुन्हा रस्त्यावरच वळवुन मग आडतीला सोयाबीन नेले जात आहे.

तुळजापूर तालुक्यात मागील दहा ते पंधरा दिवसापासुन पावसाची सततधार चालु होती नुकतीच दोन दिवसापासून पावसाने उघड दिल्याने शेतातील पाण्यातुन सोयाबीन काढणीसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतात सर्वञ ओल असल्याने काढलेले सोयाबीन ठेवायाचे कुठे असा प्रश्न पडल्याने संकटाशी दोन हात करुन  मात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतातील काढलेले सोयाबीन रस्ते बायपास रस्त्यावर आणुन त्याचे ढीग रचले असुन  पावासापासुन संरक्षण व्हावे ताडपञी अंथरुन पाऊस पडला तर काढलेले सोयाबीन भिजू नये याची परिपुर्ण दक्षता घेत आहे. दररोज काढलेले सोयाबीन डोक्यावरून रस्त्यावर आणुन ढीग रचत आहे हे वळल्यानंतर रस्त्यावरच तो आता सोयाबीन खिळे करणार आहे.   त्यामुळे सध्या ग्रामीण भागात रस्त्यावर शेतात  सोयाबीन काढणीची लगबग सुरु झाली आहे.

हार्वेस्टर ने काढणीसाठी बळीराजा उघडीप च्या  प्रतिक्षेत!
सध्या शेतकरी वर्गाचा कल यांञिकीकरणाचा माध्यमातून शेती करण्याकडे वाढला असुन हार्वेस्टर माध्यमातून कमी खर्चात वेळेत खळे होत असल्याने तो सध्या पाऊस थांबुन राने वाळण्याची प्रतिक्षा करीत आहे राने वाळला की तो हार्वेस्टर माध्यमातून सोयाबीन खळे करण्यासाठी पाऊस थांबण्याची व रान वाळण्याची वाट बघत आहे. 

यांञिकिकरणामुळे मजूर टंचाई वर मात !
शेतकरी यांञिकिकरणाकडे वळल्याने सध्या मजूर टंचाईचा कमी प्रमाणात जाणवत असल्याने सोयाबीन काढणी दर ही उतरले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages