बँक ऑफ महाराष्ट्र सांगोला शाखेच्यावतीने सांगोला नगरपालिकेस साहित्य वाटप


सांगोला (प्रतिनिधी) - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे, वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या महत्वपूर्ण योजनेंतर्गत नगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटायझर, हँड ग्लोझ आदि साहित्य मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडे बँकेचे व्यवस्थापक सुजितकुमार यांनी साहित्य दिले . या वेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंब प्रमुखाने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे,असे सांगून येणाऱ्या काळात सोशल डिस्टन्स ठेवावा,मास्क वापरणे,आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, जास्तीत जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,असे सांगून बँकेने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटायझर,हँड ग्लोझ,आदी साहित्याचे वाटप केले. यावेळी सामाजिकतेचे भान ठेवून सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्यावतीने सांगोला नगरपालिकेस 200 ग्लोज, 100 मास्क, 10 थर्मल स्कॅन मशीन, 10 ऑक्सिमिटर नक्षीचे वाटप करण्यात आले.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र, सांगोलाचे शाखाधिकारी सुजित कुमार,ओ एस.अभिलाषा निंबाळकर,नगरपालिकेच्या को कोओरडीनेटर शिवाजी सांगळे, कृष्णा डोंगरे,गणेश कपडेकर, व बँकेचा व नगरपालिकेच्या आदी कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments