Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रस्तावित शाळा सेवक संचमान्यता : मोहोळ मुख्याध्यापक संघाचे निवेदन

प्रस्तावित शाळा सेवक संचमान्यता : मोहोळ मुख्याध्यापक संघाचे निवेदन


पोखरापूर दि.८(क.वृ.): राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी सेवकसंच मान्यतेचे सध्याचे निकष बदलून नवीन धोरण शिक्षण आयुक्तांनी प्रस्तावित केले आहे.या धोरणामुळे राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे.या प्रस्तावित धोरणा गोरगरीबांच्या व बहुजनांच्या पाल्याच्या शिक्षणाच्या शाळा बंद होणार आहेत.शिक्षण आयुक्तांचे १३जुलै २०२० चे प्रस्तावित संचमान्यता धोरण पत्र तातडीने रद्द करण्याची मागणीचे निवेदन  मोहोळ तालुका माध्यमिक व उच्च माध्यमि शाळा मुख्याध्यापक संघाचे वतीने मोहोळचे नायब  तहसीलदार श्रीमती विना खरात यांना देण्यात आले. यावेळी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुधीर गायकवाड,सचिव रामचंद्र पाटील, प्राचार्य चंद्रकांत ढोले, तालुका पतसंस्थेचे माजी चेअरमन आयुब इनामदार, प्राचार्य एस.बी.बाबर, माजी प्राचार्य श्रीधर उन्हाळे, राजकुमार वसेकर, प्राचार्य मोहोळ मोटे आली पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी प्रस्तावित केलेल्या संचमान्यता धोरणांच्या शिफारस पत्रातील मजकूर व अटी पाहिल्यास, दोनशे पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक  शाळा बंद होणार आणि त्या शाळेतील शिक्षकांची पदे कमी होणार.पंचवीसपेक्षा कमी.पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार , तेथील शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. असे प्राचार्य ढोले यांनी यावेळी सांगितले.
कमी पटसंख्या असलेल्या शाळाबाबत सरासरी उपस्थिती कमी झाल्यास अनुदान बंद करणे किंवा कपात करण्याची तरतूद होती. आता प्रस्तावित संचमान्यता धोरणांच्या निकषांत प्रत्येक वर्गाची सरासरी पटसंख्या खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील -१५, खाजगी अनुदानित प्राथमिकसह उच्च प्राथमिक वर्ग असणा-या शाळेत -२०,व खासगी अनुदानित माध्यमिक शाळेतील-२५,या पेक्षा कमी असल्यास व अनुक्रमे १,३,५ किमी.परिसरात संबंधित प्रकारची शाळा असल्यास अशा शिक्षकाचे समायोजन परिसरातील शाळेत करण्याची तरतूद आहे.
शिक्षण आयुक्त कार्यालयाने दि.१३जुलै २०२० रोजी सेवक संचमान्यता बाबत प्रस्तावित केलेले पत्र हे पुरोगामी महाराष्ट्रातील सार्वत्रिक शिक्षण व्यवस्थेला धक्का देणारे आहे.त्या पत्रातील एकही मुद्दा अभ्यासपूर्ण नाही व एकाही शाळेतील वस्तुस्थिततीला धरून नाही, सदरचे पत्र तातडीने रद्द करण्याची मागणी मासोळी तालुका माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे वतीने शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments