Hot Posts

6/recent/ticker-posts

सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार ; राजकारण करू नये असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार ; राजकारण करू नये असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दि.१८(क.वृ.):- इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहेयामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही.

एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व  आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश देण्यात आले  आहेत.

त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments