पीक कर्जमागणाऱ्या शेतकऱ्याला बँकेने दिले हाकलून

तुळजापूर दि.११(क.वृ.):- तालुक्यातील काटी येथील बँक आँफ महाराष्ट्र शाखेने चकरा मारुन ही अचानक पणे मला पिककर्ज मंजूर करता येत नाही असे म्हणून बँकेतुन हाकलून दिल्याने मला मोठा मनस्ताप दिल्याने मला मानसिक अर्थिक यातना भोगाव्या लागल्या असुन तरी या प्रकरणी संबंधित दोषीवर कारवाई करावी व माझी अर्थिक परिस्थिती खालावल्याने मला पिकविमा मंजूर करुन द्यावा अन्यथा नाईलास्तव 17 सप्टेंबर 2020 पासुन जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसावे लागेल असा इशारा अण्णासाहेब दशरथ माळी (हागरे)यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दिला आहे.
जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहेकी मी दशरथ माळी माझी शेती सावरगाव येथे दोन हेक्टर असुन दि.16 जून 2020 रोजी बँक आँफ महाराष्ट्र शाखा काटी येथे मँनेजर व कर्मचाऱ्यांनी मागणी प्रमाणे कागदपत्रे देवुन पिककर्ज मागणी केली या पुर्वी मी कुठल्याही बँकेकडे कर्जमागणी केली नव्हती प्रथमच केली असुन 16 जुन ते 4 सप्टेबर 2020 या कालावधीत बँकेत सतत चकरा मारत राहीलो 4 सप्टेंबरला अचानक पणे तुम्हाला कर्जदेता येत नाही बँकेतुन हाकलुन दिले. याचा मला मानसिक ञास झाला असुन अर्थिक मनस्ताप भोगावा लागला आहे. तरी संबंधित दोषीवर कारवाई करावी व पिककर्ज मंजूर करावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषाण करणार असल्याचा इषारा निवेदन ध्दारे दिला.
0 Comments