तात्काळ आरक्षण उठवा अन्यथा राज्यभर आंदोलन उभारणार


तुळजापूर दि.११(क.वृ.):- मराठा समाजाचा आरक्षणला सर्वाच्य न्यायालयाने दिलेली स्थगिती घटना ही राज्य सरकारने व्यवस्थित पाठपुरावा न केल्याने घडल्याचा आरोप करुन हा सरकारचा नाकर्ती पणा असल्याचा स्पष्ट करुन मराठा आरक्षणा वरील स्थगिती तात्काळ उठविण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा पुनश्च मराठा समाज रस्त्यावर उतरुण आमदार खासदार यांना तालुका जिल्हाबंदी करावी लागेल व राज्यभर आंदौलन केले जाईल असा इषारा मराठा क्रांती मोर्चाने तहसिल येथे सरकारचा निषेधाचा घोषणि देवुन त्यांना निवेदन देवुन दिला.
निवेदनात म्हटले आहेकी सरकारने व्यवस्थित पाठापुरावा न केल्याने मराठा समाजाचा आरक्षणला स्थगिती मिळाली आहे. तामिळनाडू तेलगंणा आंद्र राजस्थान इ त्यादी राज्याची आरक्षण सुनावणी गेली अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. मराठा आरक्षणा बाबतीत वकिल का बदलले हा सर्व प्रकार मराठा समाजाचा विश्वासघात करणारा व फसवणूक करणारा असल्याचे निवेदनात म्हटलं आहे तरी तात्काळ आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठविण्यासठी प्रयत्न सरकारने करावेत अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरुण आंदोलन करेल असे इषारा वजा निवेदन मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक जिवरानजे इंगळे सुनिल नागणे महेश गवळी सज्जन सांळुके जिवनराजे इंगळे धर्यशिल कापसे कुमार टोले अण्णा क्षिरसागर शरद पवार तुकाराम ढेरे विशाल सावंत प्रशांत अपराध प्रशांत इंगळे सुनिल दिवटे या प्रमुख पदाधिकारी सह मराठा समाजबांधवांनी दिले.
0 Comments