ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला ग्रामविकास विभागाच्या योजनांचा आढावा |

मुंबई, दि.३०(क.वृ.): ग्रामविकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या कामांना गती द्यावी, अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्रालयीन दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, सचिव, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना श्री. किडे, वित्त, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रवीण जैन, उपसचिव (योजना) उदय जाधव उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत असलेली कामे सुरु करण्यासाठीची कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे निर्देशही देण्यात आले. यावेळी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतुद, योजनांवरील खर्च, प्रशासकीय कामांना मान्यता, याबाबतही चर्चा करण्यात आली.
0 Comments