कोरोना चाचण्यांचे दर पाचशे ते सातशे रूपयाने स्वस्त राज्य शासनाचा निर्णय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 8, 2020

कोरोना चाचण्यांचे दर पाचशे ते सातशे रूपयाने स्वस्त राज्य शासनाचा निर्णय

कोरोना चाचण्यांचे दर पाचशे ते सातशे रूपयाने स्वस्त राज्य शासनाचा निर्णय 


सोलापूर, दि.: राज्यातील कोरोनाग्रस्तांना शासनाने दिलासा दिला असून कोरोना चाचणीसाठी एनएबीएल आणि भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (आयसीएमआर) मान्यता दिलेल्या खासगी प्रयोगशाळेत चाचण्यांचे दर आणखी कमी केले आहेत. पूर्वीच्या दरापेक्षा हे दर पाचशे ते सातशे रूपयांनी स्वस्त झाले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले.

सामान्य जनतेला परवडणारे कोरोना चाचण्यांचे दर असावेत, अशी मागणी येत असल्याने राज्य शासनाने दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली होती. समितीचा अहवाल शासनाला सादर झाला असून त्यानुसार कोरोना चाचण्यांचे दर आकारले जाणार आहेत. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील औद्योगिक संस्था, औषध निर्माण संस्था सुरू झाल्या आहेत. परिवहन सेवाही सुरू झाली असून चाचण्यांसाठी रिएजंटस, व्हीटीएम कीट, पीपीई कीट, एन95 मास्क, आरएनए एक्स्ट्रॅक्शन की जेम पोर्टलवर माफक दरात उपलब्ध झाले आहे. आयसीएमआरने उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने उपलब्धता वाढली आहे. मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची संख्याही वाढली आहे.

यामुळे कोरोना चाचण्यांचे सुधारित दर निश्चित करण्याचे शासनाने ठरविले आहे. कोणत्याही प्रयोगशाळेला सुधारित दरांपेक्षा अधिक दर आकारता येणार नाहीत, असा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.

 

सुधारित आणि पूर्वीचे दर खालीलप्रमाणे

 

  • संकलन केंद्रातून नमुने घेऊन तपासणी- 1200 रूपये (पूर्वीचे-1900 रूपये)
  • दवाखाने, क्वारंटाईन सेंटरमधून नमुने घेऊन तपासणी-1600 रूपये (पूर्वीचे-2200 रूपये)
  • रूग्णांच्या घरून नमुने तपासणी-2000 रूपये (पूर्वीचे-2500 रूपये)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages