Hot Posts

6/recent/ticker-posts

तपासणीस येणाऱ्या पथकाला खरी माहिती द्यावी - पालकमंत्री ; माझे कुटुंब माझी जबाबदारी म़ोहिमेस सहकार्याचे आवाहन

तपासणीस येणाऱ्या पथकाला खरी माहिती द्यावी - पालकमंत्री ; माझे कुटुंब माझी जबाबदारी म़ोहिमेस सहकार्याचे आवाहन  

 


पंढरपूरदि.१९(क.वृ.):-  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही शासनाची मोहीम संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीसाठी घरी येणाऱ्या आरोग्य पथकास संपूर्ण माहिती द्यावी नागरिकांनी आजाराची कोणतीही माहिती लपवू नये असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

मौजे चिखलीता.मोहोळ येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी’  या मोहिमेतंर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  आमदार यशवंत मानेसरपंच इंदूबाई वाघमोडेजिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटीलजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरजिल्हा आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादारगटविकास अधिकारी अजिंक्य येळेनायब तहसिलदार राजशेखर लिंबारेतालुका आरोग्य अधिकारी अरुण पाथरुटकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री भरणे म्हणाले,  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेतंर्गत शहरगाववस्ती यातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांना आरोग्य बाबतचे शिक्षण देण्यात आहे. आपण स्वत: आपले  व कुटुंबाची जबाबदारी घ्यावी जेणे करुन आपल्याला व आपल्या कुटुंबाला कोरोनाची बाधा होणार नाही.  त्यासाठी तोंडाला मास्कचा वापरसुरक्षित अंतर,  सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनावा संसर्ग रोखण्यासाठी या माहीमेत लोकसहभाग महत्वाचा असून सर्व नागरिकांनी या मोहीमेतंर्गत आरोग्य तपासणी करुन घ्यावी व आरोग्य पथकास सहकार्य करावे असेआवाहनही पालकमंत्री भरणे यांनी यावेळी केले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही शासनाची मोहीमेत सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा. आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तर आपण नक्कीच आपले गावशहर तसेच जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी हातभार लागेल असे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतंर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती गटविकास अधिकारी  अजिंक्य येळे यांनी दिली.

पालकमंत्री भरणे यांनी  मते कुटुंबियांची घेतली भेट

माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेतंर्गत  मौजे चिखली तालुका मोहोळ येथे मते कुटंबियांच्या घरी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आरोग्य पथकासह भेट दिली. आरोग्य पथकाकडून मते कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री भरणे यांनी कोरोना पासून स्वत: ला आपल्या कुटुंबाला  सुरक्षित कसे ठेवायचे. घरात कोणती काळजी घ्यावी. याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटीलजिल्हाधिकारी मिलींद शंभरकर,  जिल्हा आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार उपस्थित होते.  

Reactions

Post a Comment

0 Comments