सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी जाधव

अकलूज दि.१६(क.वृ.): सोलापूर येथील जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिभीषण जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.गत २५ वर्षांपुर्वी माळशिरस तालुक्यातील अ. बा. माने हे शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष होते. त्यानंतर आजतागायत या चेअरमनपदाने माळशिरस तालुक्याला हुलकावणी दिली होती. बिभिषण जाधव यांच्या रूपाने माळशिरस तालुक्याकडे पुन्हा एकदा शिक्षक व सेवकांची सेवा करण्याची संधी चालून आली आहे. निवड बिनविरोध झाल्यामुळे तर जिल्हाभरातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी व्हाईस चेअरमपदी तात्यासो. बागल यांचीही निवड बिनविरोध करण्यात आली. निवडणुक प्रक्रियेत निर्णय अधिकारी म्हणून डी. एस. भवर यांनी काम पाहिले. निवडीच्या प्रसंगी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी चेरमन सुनिल डोके, संचालक समाधान घाडगे, मुकूंद मोहिते, संतोष गायकवाड, शंकर वडणे, श्रीधर उन्हाळे, धनंजय बनसोडे, निवास येलपले, चनबसप्पा बिराजदार, नागनाथ राऊत, परमेश्वर व्हसुरे, मनीषा नागणे सचिव चंद्रकांत भोसले, संजय राऊत, राजेंद्र देवकर हे उपस्थित होते.
बिभिषण जाधव यांच्या निवडीनंतर भाजपा नेते विजयसिंह मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणज़ितसिंह मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक संग्रामसिंह मोहिते -पाटील, कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील यांनी त्यांचा सन्मान करून पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments