Hot Posts

6/recent/ticker-posts

सेवायोजन नोंदीशी आधार क्रमांक जोडा ; तीस सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

सेवायोजन नोंदीशी आधार क्रमांक जोडा
तीस सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत


सोलापूर, दि.१६(क.वृ.)सोलापूर जिल्ह्यातील सेवायोजन नोंदणी केलेल्या सर्व नोकरी इच्छुक उमेदवारांनी आधार क्रमांक आपल्या नोंदणीशी संलग्न केला नसेल तर तो तत्काळ करुन घेणे आवश्यक आहे. आपल्या नोंदणीला आधार क्रमांक नोंदणी (लिंक)  करण्यासाठी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत आहे, असे माहिती कौशल्य विकासरोजगार व उद्योगकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी कळविले आहे.

नोकरी इच्छुक उमेदवारांना नावनोंदणी करण्यासाठी कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता विभागामार्फत महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टल विकसित केले आहे. जिल्ह्यातील 1,01,907 उमेदवारांच्या सेवायोजन कार्डला आधार लिंक नाही. या अगोदर उमेदवारांना एसएमएसद्वारे आधार लिंकच्या प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी कळविण्यात आले आहे. आधार लिंकची प्रक्रिया महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवरुन ऑनलाईन पध्दतीने तत्काळ पूर्ण करावी, असे आवाहनही श्री.जाधव यांनी केले आहे.

सेवायोजन कार्डच्या नोंदणीला आधारक्रमांक लिंक करण्यासाठी अडचण येत असल्यास 0217-2722116 यावर किंवा solapurrojgar1@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.

Reactions

Post a Comment

0 Comments