Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षण आमदार सुभाष देशमुख यांना घेराव

 मराठा आरक्षण आमदार सुभाष देशमुख यांना घेराव

सोलापूर दि.१७(क.वृ.): सोलापूर मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आमदारांनी पाठपुरावा करावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड सोलापूर च्या वतीने शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख याना घेराव घालून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी एक मराठा लाख मराठा. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे या घोषणा देण्यात आल्या. मराठा समाजाच्या आरक्षणाला ९ सप्टेंबर रोजी सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाचा सन्मान असला तरी आता अधिक खोलात न जाता सर्व राजकिय विचार सरणी बाजुला ठेवून वर्षानुवर्ष मराठा समाजाची मागणी असलेल्या आरक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे यासंदर्भात मराठा समाजाने केलेल्या सहकार्याची जाणिव ठेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना मरठा आरक्षण आणि समाजाच्या अन्य मागण्यांसाठी दोन दिवसात महाअधिवेशन घ्यावे तसेच आरक्षण स्थगितीच्या निर्णयाच्या संदर्भात शासनाने लवकरात लवकर पुर्नविचार याचिका दाखल करावी अशी मागणी करण्यासाठी चालु शैक्षणिक वर्षात वैद्यकिय व अन्य उच्च शिक्षण शाखांमध्ये तसेच शालेय प्रवेशातील देखील आरक्षण रद्द करण्यात आले आहे.

त्यामुळे स्थगिती पूर्वी झालेले शैक्षणिक प्रवेश आणि नोकरभरतीतील आरक्षण जैसे ठेवण्यासाठी वट हुकूम काढण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते तसेच आपापल्या पक्षांचे नेते यांना पत्र पाठवावे अशी मागणी देकील निवेदनात करण्यात आली आहे.संभाजी  चे शहर उपाध्यक्ष सीताराम बाबर आशुतोष माने  संभाजी पाटील सनी पटू संजय भोसले अजित शेटे अविनाश फडतरे हर्षवर्धन शेजेराव संतोष धोत्रे सनी पाटील  संजय  भोसले श्याम पाटील   ईरया स्वामी रणजित माळी बसव राज आळगे. ईत्यादी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments