कांदा निर्यत बंदी रद्द करा

तुळजापूर दि.१५(क.वृ.):- केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीचा राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापुरच्या वतीने निषेध करण्यात येवुन कांदा निर्यात बंदी त्वरीत रद करण्याचा मागणीचे निवेदन राष्ट्रवादीकाँग्रेस ने तहसिलदार यांना देवुन केली.
काही दिवसापुर्वी याच केंद्र सरकारकडून कांदा दर नियंत्रणमुक्त केले व कांदा अत्यावश्यक वस्तुच्या कायद्यातुन काडले असे असतानाहि केंद्रातील भाजपा सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला असा ढोल वाजविला गेला. आणि आता वेळ येताच दलालांना पैसे मिळावेत म्हणून केंद्र सरकारने पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी विरोधी हा तुघलकी निर्णय घेतला.
शेतकऱ्यांना प्रति बेगडी प्रेम दाखवून अजून किती दिवस शेतक-यांचा बळी घेणार आहात. असा सवाल करुन कांदा उत्पादक शेतकर्यांचे कंबरडेच मोडणार हा निर्णय त्वरीत रद्द करा व निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करन्याचा इशार्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते गोकुळ शिंदे,,धनंजय पाटील,शहराध्यक्ष अमर चोपदार,तौफीक शेख(अल्पसंख्यांक शहराध्यक्ष),व्यापार आघाडीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार,विद्यार्थी शहराध्यक्ष समर्थ पैलवान उपस्थित होते.
0 Comments