जनसेवा संघटना महिला आघाडीच्या वतीने प्रांत कार्यालयावर थाळीनाद आंदोलन

अकलूज दि.२६(क.वृ.): बचत गट मायक्रो फायनान्स व वीजबिल माफ करणेसाठी जनसेवा संघटनेचे महिला आघाडीच्या वतीने अकलुज प्रांत कार्यालयावर थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजला आहे. सहा महिन्यापासून सगळीकडे लाॅकडाऊन सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे मोलमजुरी करणारे लोकांचे काम बंद झाले आहेत. घरातील पुरुषांना व मोल मजुरी करणाऱ्या महिलांना कसलेही प्रकारचे काम मिळत नसल्याने हतबल झाली आहेत. अशा गरीब कुटुंबातील लोकांना स्वतःचे कुटुंब जगवणे अवघड झाले असलेने मायक्रो फायनान्स बचत गटाचे हप्ता व कर्ज तसेच वीजबिल भरणे शक्यच होणार नाही. मायक्रो फायनान्स व बचत गट घेणारी सर्व कुटुंब हे अत्यंत गरीब कुटुंब आहेत. सकाळी काम मिळाले तर संध्याकाळी चूल पेटते व तेव्हाच घर चालते अशी या लोकांची परिस्थिती आहे.
या परिस्थितीतही या गोरगरीब लोकांनी यापूर्वी बचत गटाचे व मायक्रो फायनान्सचे सर्व हप्ते व वीजबिलाचे बिल सर्व हप्ते भरलेले आहेत आहे वेळेवर कर्जाची परतफेड केली आहे. सद्यपरिस्थितीत घरही खर्च भागवणे अशक्य झाले आहे.सर्व महीलांची मानसिकता भयावह झाली आहे. अनेक लोकांना कामे नसलेने कुटुंबे विस्कळीत झाली आहेत. महाराष्ट्रातील अशी लाखो कुटुंबे अत्यंत वाईट परिस्थितीत जीवन जगत आहेत अशा कुटुंबांना आपण आर्थिक आधार द्यावा व यांचे जीवनमान उंचवणेसाठी ज्या प्रमाणे शेतकर्याचे कर्ज माफ केले. त्याप्रमाणे केंद्र शासनाने व महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्वच बचत गट व मायक्रो फायनान्स कंपनीचेचे कर्ज तसेच सर्व लाईट बिल माफ करणे साठीचे जनसेवा संघटनेचे वतीने थाळीनाद आंदोलन करणेत आले.
गांधी चौक येथे महात्मा गांधी यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून मोर्चास सुरवात करणेत आली. छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले अण्णाभाऊ साठे व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून हा मोर्चा प्रांत कार्यालय अकलुज येथे गेला या मोर्चा मध्ये माळशिरस तालुका, माढा तालुका व सांगोला तालुक्यातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला प्रत्येक महीलांचे हातातील ताट आणी चमचा वाजवत होत्या या थाळीनादाने व घोषणाबाजीने संपुर्ण परिसर दणाणून गेला होता. बचत गटाचे कर्ज व लाईट बिल माफ न केलेस डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन प्रांताधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्ता मामा भरणे, जिल्हाधिकारी सोलापूर, यांना निवेदन देणेत आले.
यावेळी जनसेवा संघटनेच्या महिला आघाडीच्या जोतीताई कुंभार शांताबाई शहापुरे,जनसेवा महिला आघाडीच्या जोतीताई कुंभार, शांताबाई शहापुरे, महालक्ष्मी सगर, सावीत्रा रास्ते, सुरेखा वसव वैष्णवी पवार, नमीता कोरके संगीता पवार, माधुरी वघचौरे, रेश्मा गायकवाड, मेघा रास्ते वर्षा सटाले, सुनीता सुरवसे,सरस्वती पवार, सविता शिंदे, निला शेगर,प्रियंका शिरसट, बानु गायकवाड, रुक्मिणी गायकवाड, सविता भोसले, तुळसा शिंदे, अनिता गुडे तसेच जनसेवा संघटनेचे नेते सतिशनाना पालकर, सरचिटणीस सुधीर रास्ते खजिनदार राजाभाऊ गुळवे नवनाथ साठे युवक जिल्हा सरचिटणीस मयुर माने सागर देशमुख महेश शिंदे विजय सगर उपस्थित होते.
0 Comments