‘गोरगरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा’ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी |


मुंबई, दि.9(क.वृ.): कोरोना उद्रेकानंतर उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीत राज्यातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक व सेवाभावी संस्थांनी गोरगरीबांना अन्नदान, औषधी, जीवनावश्यक सामग्री, गावी जाण्यासाठी वाहनव्यवस्था पुरवून असामान्य सेवा केली. गोरगरीब व दिनदुबळ्यांची सेवा ही खरी ईश्वरसेवाच आहे. अशा प्रकारे सर्वांनी करुणा जागविल्यास कोरोना संकटावर धैर्याने मात करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना काळात विविध प्रकारे सेवाकार्य करणाऱ्या १८ सेवाभावी संस्थांचा राजभवन येथे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. लोढा फाऊंडेशनच्यावतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
0 Comments